Sam Konstas Strange Behavior Against Virat Kohli and Team India : मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात एक राडा पाहायला मिळाला आणि त्या राड्याचे पडसाद संपूर्ण सामन्यात उमटले. तो राडा होता १९ वर्षीय पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास व विराट कोहली यांच्यामधला. विराटने कॉन्स्टासला धक्का दिला आणि मग मैदानावर, सोशल मीडियावर, वर्तमानपत्रात वादळ उठलं ते अगदी सामना संपेपर्यंत शांत झालंच नाही. सुरूवातीला युवा सॅम कॉन्स्टासला सहानभूती मिळाली आणि विराटला दंडरूपाने शिक्षाही झाली. संपुर्ण सामन्यादरम्यान चालेल्या या गर्मागर्मीचा क्रम जाणून घेऊयात.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांमध्ये विराटवर खालच्या भाषेत टीका करण्यात आली. 'जोकर विराट कोहली, घाबरट विराट कोहली' अशा टीका करत त्याला हिणवण्यात आले. विराटला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून देखील चिडवण्यात आले.
virat kohli in australian newspaperपहिल्या डावात विराट ३६ धावांवर बाद झाला. तो स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर झेलबाद होत माघारी परतला. विराट बाद झाल्यानंतर कॉन्स्टासने पुन्हा विराटविरूद्ध सेलिब्रेशन केले आणि प्रकरण आणखी चिघळले. दुसऱ्या डावात सॅम कॉन्स्टासला बुमराहने ८ धावांवर बोल्ड केले आणि त्याच्याप्रमाणे सेलिब्रेशन करत सॅमला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यावेळी एकट्या बुमराहने नाही. तर सुंपूर्ण टीम इंडियाने सॅम कॉन्स्टाच्या विकेटवर आनंदोत्सव साजरा केला.
दुसऱ्या डावातही विराट स्वस्तात माघारी परतला. तो दुसऱ्या डावात अवघ्या ५ धावा करू शकला. त्यानंतर सॅमने खांदे हलवत पुन्हा विराटविरूद्ध सेलिब्रेशन केले. त्याला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळाला.
इतके सर्व होऊनही सॅम शांत बसला नाही. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांच्या तो खोड्या काढू लागला अर्थात स्लेजिंग करू लागला. पहिल्या डावात गुणी वाटेलेल्या सॅमने अंतिम डावात आपले रंग दाखवले. यशस्वी जैस्वाल फलंदाजी करत असताना सिली पॉईंटमध्ये उभा असलेला कॉन्स्टाने जैस्वालची खोडी काढली व त्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर जैस्वालने, "शांतपणे आपले काम कर," म्हणत प्रत्युत्तर दिले.