पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारला आहे.
पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्याकडून नव्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या शुभेच्छा
आजपासूनच नव्या जिल्हाधिकाऱ्यांने स्वीकारला पदभार
ajit pawar : पुण्यात झळकले अजित पवार पालकमंत्री असल्याचे बॅनरपुण्यात झळकले अजित पवार पालकमंत्री असल्याचे बॅनर झळकले आहेत.
अजित पवार पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अश्या मजकूर असलेले बॅनर पुण्यात झळकले
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात झळकले हे बॅनर
महायुतीत पालकमंत्री पदावरून तेढ कायम
मात्र पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले बॅनर
SITचे प्रमुख बसवराज तेली केजमधून बीडकडे रवानाएसआयटीचे प्रमुख बसवराज तेली केजमधून बीडकडे रवाना
आरोपी कृष्णा आंधळे यांच्या कुटुंबांची केली चौकशी
एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांनी आज दुपारी केज येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कृष्णा आंधळे यांच्या कुटुंबांना चौकशीसाठी बोलवलं होतं.
तब्बल ३ तास पेक्षा अधिक काळ आंधळे यांच्या कुटुंबाची चौकशी केली असून आता SIT पथक हे बीडकडे रवाना झाले आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे आरोपी फरार असल्याने एसआयटी स्थापन करण्यात आली आहे
नागपूर जिल्ह्यातील बाबुळखेडा शिवारात गोळीबार,एकाचा मृत्यूनागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बाबुळखेडा शिवारात गोळीबार झाल्याची घटना घडलीय. पवन हिरणवार नावाच्या व्यक्तीवर कार मधून जात असताना गोळीबार झाला. यात पवन हिरणवार याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक जण जखमी झालाय. गोळीबार करणारे बाईकवरून आले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
बदलापुरात महिलेकडून वाहनांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैदबदलापुरात एका महिलेनं गृहसंकुलातील गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडलीये. रितू वर्ल्ड सोसायटीतली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. बुधवारी रात्रीच्या सुमारास या महिलेने चार चाकी आणि दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालीय. ही महिला नेमकी कोण आहे? याचा शोध सुरू आहे.
अमरावतीत आमदार प्रवीण तायडेंचं पोस्टर फाडलं, भाजप आक्रमकअमरावतीच्या बहिरम यात्रेतील भाजपा आमदार प्रवीण तायडे यांचे पोस्टर लावले होते. ते पोस्टर फाडण्यात आले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या पोस्टरवर थुंकून ते फाडल्याने भाजप आक्रमक झाले आहे. भाजपचे शेकडो कार्यकर्ते अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं होतं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीकडून कारवाईला सुरुवात, एकाला घेतलं ताब्यातसंतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीकडून कारवाईला सुरुवात झालीय. तपासासाठी केजमधून एकाला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे.
जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारीपुणे जिल्हाधिकाऱ्यांची बदली, जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी
डॉ सुहास दिवसे यांचं प्रमोशन
सुहास दिवसे यांची जमावबंदी आयुक्त व संचालकपदी नियुक्ती
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली झाली आहे.
संतोष पाटील यांना साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक अनंतात विलीन, नाईक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमाजी आमदार प्रदीप नाईक यांचं बुधवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होतं. आज प्रदीप नाईक यांच्यावर नांदेडच्या किनवट तालुक्यातील त्यांच्या मूळगावी दहेली तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप नाईक यांनी किनवट विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा प्रतिनिधित्व केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते नेते होते. या विधानसभा निवडणुकीत देखील प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बुधवारी त्यांना हृदय विकाराचा झटका आला.त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.नाईक यांच्यावर किनवट तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दहेली तांडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधी साठी जनसागर उसळला होता.
पुण्यातील लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड, १५ दिवसात तिसरी घटनामंगळवारी नववर्षानिम्मित सर्वत्र जल्लोष करण्यात आला मात्र लोहगाव परिसरात दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. चार अल्पवयीन मुलांनी मद्यप्राशन करून लोहगाव मधील खेसे पार्क भागात एक चार चाकी, टेम्पो, आणि दुचाकीला दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले आहे. या अल्पवयीन मुलांना लोहगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. तर अश्याच घटना लोहगाव परिसरात मागील १० ते १५ दिवसात तिसऱ्यांदा घडली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उद्भवला आहे.
नांदेडच्या माळेगाव यात्रेत भव्य कृषी प्रदर्शनदक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेची ओळख आहे.या यात्रेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात येतं.येंदा देखील नांदेडच्या जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेत भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कृषी प्रदर्शनामध्ये 103 स्टोल लावण्यात आले आहेत.त्यासोबतच जिल्ह्यातील कृषिनिष्ठ 16 शेतकऱ्यांचा सन्मान आणि फळभाजी पाला,मसाला पिके स्पर्धा घेण्यात आलीय.
Pune News: पुण्यातील लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोडगेल्या १० ते १५ दिवसात ही तिसरी घटना
मंगळवारी नववर्षानिम्मित सर्वत्र जल्लोष करण्यात आला मात्र लोहगाव परिसरात दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात आली
चार अल्पवयीन मुलांनी मद्यप्राशन करून लोहगाव मधील खेसे पार्क भागात एक चार चाकी, टेम्पो, आणि दुचाकीला दगडफेक करून वाहनांच नुकसान केल
या अल्पवयीन मुलांना लोहगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे
तर अश्याच घटना लोहगाव परिसरात मागील १० ते १५ दिवसात तिसऱ्यांदा घडली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उद्भवला आहे
माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; हल्ल्यात दोन्ही पाय तोडलेशहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत चार चाकी गाडी फोडत बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत माजी सरपंच चाचे दोन पाय तुटल्याने उपचारासाठी प्रथम शहापूर येथील रूग्णालयात दाखल केले होते. मात्र दोन्ही पाय तुटल्याने पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.
अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने घरून कार घेऊन सकाळी 10 वाजता निघाले होते मात्र अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या वरती आल्यावर काही अज्ञात व्यक्तीने गाडी आडवली व कार वर दगडांचा मारा केला यात आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडा यांना गाडी बाहेर काढत मारहाण केली या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन पाय जब्बर मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी दोन तुटल्याचे सांगितले यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे.
याबाबत पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत
मकरसंक्रांत गोड होणार! मार्केट मधील तिळाचे भाव जाणून घ्यावर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी सज्ज होताना दिसत आहेत. मकरसंक्रांती सणात तिळगुळाला मोठे महत्त्व असते. महिलावर्ग तीळ व गुळाचे मिश्रण करून तिळगूळ पदार्थ तयार करतात. याच निमित्ताने बाजारात तिळाला मोठी मागणी आहे. यंदा बाजारात तिळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आल्याने भाव देखील स्थिर आहेत. तसेच मागील वर्षी झालेल्या पावसामुळे तिळाचे पीक चांगले आल्याने भाव सुद्धा सामान्यांना परवडणारे असून संक्रांत गोड होईल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून देण्यात येतेय. गावरान तिळाचे भाव २०० ते २२० प्रति किलो आहेत तर polished तिळाचे भाव २२० ते २४० प्रति किलो असे आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेमधून खाली पडून प्रवासी जखमी० तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधुन प्रवासी खाली पडला
० ओमकार राऊत वय वर्ष 24 राहणार देवगड सिंधुदुर्ग असे जखमी रेल्वे प्रवाशाचे नाव
० मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना रोहा ते कोलाड रेल्वे स्थानका दरम्यान पहाटे झाला अपघात
० अपघातग्रस्त तरुण मित्रांसोबत तुतारी एक्सप्रेस मधून प्रवास करीत होता
० सदर अपघाताची माहिती झाला सोबत असलेल्या मित्रांनी माणगाव रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानांना दिल्यानंतर करण्यात आले बचाव कार्य
० गंभीर जखमी तरुणाला रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून कमोठे येथील MGM रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्याले
युवकांचे व्यायाम शाळेच्या स्वतंत्र रस्त्यासाठी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन..बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिर्झा नगर मधील हाजी सय्यद उस्मान सय्यद मनू डोंगरे नगरपालिका शाळा क्रमांक दोन मध्ये व्यायाम शाळा बांधण्यात आली होती.. त्या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शाळेची भिंत ओलांडून जावं लागत आहे.. त्यामुळे व्यायाम शाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज मिर्झा नगर मध्ये युवकांनी बुलढाणा नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे..
मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा पोलीसांकडून मोठा खुलासाबंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव
बंदुकीचे लायन्स काढण्यासाठी स्व:तावर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे पोलीसात झाले निष्पन्न
फिर्यादी सरपंच नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे यांना विश्वास घेवुन चौकशी केली असता बनाव केल्याचे कबुल केल्याची पोलीसांची माहिती
26 डिसेंबर रोजी नामदेव निकम यांच्यावर राञी 10 च्या दरम्यान व्होनाळा ते मेसाई जवळगा रोडवर मोटारसायवरुन आलेल्या चौघांनी हल्ला केल्याची घटना आली होती समोर
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अर्थशास्त्राशी संबंधित त्यांनी केलेले लिखान नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, अशा भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या.
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावून तात्काळ फाशीची शिक्षा दयावी,अभिमन्यू पवार यांची मागणीबीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना सर्वच आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी.., अशी मागणी औसा मतदार संघाचे भाजपाचे आमदार अभिमन्यू यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचे अकाउंट आणि संपत्ती जप्त केली त्यावेळेस हे आरोपी शरण येत आहेत त्यामुळे यांना मोक्का देखील लावावा...
Santosh Deshmukh Case : पुण्यात 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चासंतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात ५ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा
संतोष देशमुख यांची मुलगीही मोर्चात होणार सहभागी
लाल महाल येथून होणार मोर्चाला सुरुवात
मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Santosh Deshmukh Case : एसआयटी पथक बीडच्या केज शहरातमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आला वेग
केज शहरातील शासकीय विश्रामगृहात एसआयटीचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले
फरार तीन आरोपींचा एसआयटीकडून शोध सुरू
Satara News: साताऱ्यात पतीने केली पत्नीची हत्या, धक्कादायक कारण आलं समोरसाताऱ्यात पतीने केली पत्नीची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने केली हत्या
नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Nagpur News: हैदराबाद- नवी दिल्ली दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तरुणाची हत्यानागपूरमध्ये हैदराबाद- नवी दिल्ली दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तरुणाची हत्या
एका तरुणाला चौघांनी केली मारहाण
मध्यरात्री साडेतीन वाजताचा सुमारास धावत्या रेल्वे गाडीत वादातून झालेल्या हाणामारीत तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती
दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीत घटना घडल्याची माहिती
नागपूर लोहमार्ग पोलिसांकडून चौघांना ताब्यात घेत घटनेचा तपास सुरू
मोबाईल चोरीचा कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती
Pune News: पुण्यामध्ये भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यूपुण्यातल्या येरवड्यात भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू
अपघातामध्ये पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत
Pune News: तरुणीच्या हत्येप्रकरणी गावकरी आक्रमक, पुण्याजवळील फुलगाव येथे रस्तारोकोपुण्याजवळील फुलगाव येथे नागरिकांचा रस्ता रोको
तनिष्का सोपान गवारे या तरुणीच्या खून प्रकरणी नागरिकांनी केला रस्तारोको
दोन महिने बेपत्ता असलेल्या तरुणीचा खून झाल्याची घटना
या घटनेतील आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी केला रस्ता रोको
Solapur News: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज आणि उद्या सोलापूर दौऱ्यावरजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज आणि उद्या सोलापूर दौऱ्यावर
आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणार
कालवा सल्लागार समितीची उद्या बैठक.. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी होणार निर्णय, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष
Nagpur News: नागपूरात आज 8.8 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद- नागपूरात आज 8.8 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद
- विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद आज नागपूरात
- गेल्या 24 तासात नागपूरचा पारा 5.5 ने घसरला
- नागपूर खालोखाल गोंदियात, 9.8 भंडारा 10.0 , वर्धा 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.
Pune News: अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बससेवाअष्टविनायक दर्शनासाठी एस टी ची विशेष बस सेवा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून संकष्टी चतुर्थी निमित्त १७ जानेवारीला विशेष बस सेवा
शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार
शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही बस सुटणार आहे तर याचे दर ९९० ते १००५ इतके असेल
महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या अंतर्गत महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत असेल
Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर होणार 2 नवीन फलाटपुणे रेल्वे स्थानकावर होणार दोन नवीन फलाट
पुणे रेल्वे स्टेशन येथून दररोज २०० रेल्वे गाड्या ये जा करतात
दररोज या स्थानकावरून १.५ लाख प्रवासी प्रवास करतात
Nashik News: मराठवाड्याला दुष्काळात गरजेनुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सोडलं जाणार पाणी- मराठवाड्यासाठी आता धरण साठ्यावरून नव्हे तर दुष्काळात गरजेनुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सोडलं जाणार पाणी
- उच्चस्तरीय समितीने शिफारस केल्याची सूत्रांची माहिती
- सॉफ्टवेअरद्वारे होणार जल वितरणाचे नियोजन
- पावसाळ्यात जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास उर्ध्व भागातील नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून सोडावं लागायचं पाणी
- मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार पाणी सोडण्याचे देण्यात येत होते आदेश
Navi Mumbai: उलवे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला आग, 3 दुकानं जळून खाकउलवे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली होती.
आग इतकी भीषण होती की या आगीत हॉटेलसह बाजूची 2 दुकाने देखील जळून खाक झालीत.
तर तीसऱ्या दुकानाचे देखील काहीप्रमाणात नुकसान झालेय.
आगीमध्ये आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Rajgurunagar News: राजगुरुनगरमधील २ मुलींच्या हत्याकांडातील आरोपीची रवानगी न्यायालयालयीन कोठडीतराजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्याकांडातील आरोपीला न्यायालयालयीन कोठडी..
एका मुलीवर अत्याचार करुन खुन तर दुस-याही बहिणीचा खुन केल्या प्रकरणी नराधम आरोपीला अटक करण्यात
पाच दिवसांच्या पोलीस कस्टडी नंतर आरोपीची अखेर येरवडा कारागृहात रवानगी
राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली यावरुन हा खटला फास्टट्रँक कोर्टात सुरु करण्याची आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली
अजय दास असे नराधम आरोपीचे नाव
Pune News: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, ७ नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेशपुण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
पुण्यातील सात शिवसेनेचे नगरसेवक सहा तारखेला मुंबईत जाहिर भाजपमध्ये प्रवेश करणार
चार दिवसापूर्वी सात नगरसेवकांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट
अजूनही दोन नगरसेवक भाजपाच्या वाटेवर
Nashik News: नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, ५ जणांविरोधात गुन्हा- नाशिकमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना
- या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर झाला होता गुन्हा दाखल
- तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे गुन्हा केला वर्ग
- आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपी ताब्यात
Nashik News: 2024 मध्ये नाशिकमधून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 85 हजारांनी वाढली- 2024 मध्ये नाशिकमधून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 85 हजारांनी वाढली
- 3 लाख 1 हजार 908 जणांनी नाशिकमधून केला विविध ठिकाणी विमान प्रवास
- 2023 पेक्षा 2024 मध्ये विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 85 हजाराने वाढली
- सध्या नाशिकमधून दिल्ली,बंगळुरू,हैद्राबाद, अहमदाबाद,नागपूर, इंदूर आणि गोवा या ठिकाणी सुरू आहे नियमित विमानसेवा
- तर यावर्षी कोलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी देखील नाशिकमधून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता
Kolhapur News: कोल्हापूरमध्ये थर्टी फर्स्टला 350 जणांना पोलिसांचा दणकाकोल्हापूरमध्ये थर्टी फर्स्टला 350 जणांना पोलिसांचा दणका
पोलिसांकडून एकूण 1328 कारवाया
अडीच लाखांचा दंड वसूल
31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालवणे, उघड्यावर दारू पिणे, बेदरकारपणे वाहन चालवून वाहतुकीचे उल्लंघन करणे यासह इतर गुन्हे दाखल
Pune News: पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपलीपुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली
६ हजार २४० घरांसाठी जवळपास ९३ हजार ६६२ अर्ज आले अर्ज
२८ जानेवारीला होणार सोडतीचा कार्यक्रम
तब्बल ११३ कोटीची भरली अनामत रक्कम