मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, नवे सरकार स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील राज्यात शासन आपल्या दारी म्हणत शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेणार अशी वक्तव्य केली. परंतू, सध्या राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहे. तसेच, काही शेतकरी हे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडले आहेत. परिणामी ऐन लग्नसराईत शेतकरी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आपलं लग्न व्हावं यासाठी या शेतकरी मुलाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुलगी शोधण्याची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis farmers son urges cm devendra fadnavis over farm products price and marriage issue)
विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एका अनोख्या बॅनरची चर्चा सुरू आहे. या बॅनरवर ‘शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या’, असे लिहिण्यात आले आहे. जयपाल भांडारकर असे शेतकरी पुत्राचे नाव असून त्याने हा बॅनर लावला आहे. डोक्यात टोपी आणि बाशिंग बांधून हातात फलक घेत ही बॅनरबाजी केली.
– Advertisement –
बॅनरबाजी करताना या मुलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुलगी शोधून देण्याची मागणी केली. त्यानुसार, “एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या, ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते. तेव्हा लोक आपल्या मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाचे हातात देतील”, असे शेतकरी पूत्र जयपाल भांडारकर याने म्हटले.
दरम्यान, सध्या संपूर्ण महाराष्टात लग्नसराई सुरू आहे. पण शेतकऱ्यांकडे जवळपास पाच ते दहा एकर शेती असूनसुद्धा कोणीच शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी दाखवायला वा द्यायला तयार नाहीत. यामागचं कारण असे आहे की, शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही. त्यामुळे एका शेतकरी मुलाने लग्नासाठी मुलगी शोधून द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Maha Politics : नितेश राणेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचा सवाल