Nutrition:आवर्जून खाव्यात अशा महाराष्ट्रीयन पौष्टिक कोशिंबीरी
Idiva January 03, 2025 09:45 AM

सध्याचा ऋतु म्हणजे एकदम आल्हाददायक असा आहे. हवेत गुलाबी थंडी आणि सुसह्य हवामान. यामुळे बाजारात खूप चांगल्या भाज्या आणि फळं उपलब्ध असतात. या दिवसांत भूकही चांगली लागते. महाराष्ट्रीयन घरात केल्या जाणाऱ्या रोजच्या स्वयंपाकात कोशिंबीर हा डाव्या बाजूचा आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. कधी दही तर कधी लिंबाचा रस घालून चटकदार तरीही पौष्टिक कोशिंबीर रोजच्या जेवणातला अभिन्न हिस्सा आहे. या कोशिंबीरी सॅलड वर्गातल्या असून अन्नपचनास मदत करतात. आज बघू या काही पारंपरिक कृती.

हेही वाचा: Sweet Dates: तिन्ही ऋतुत खावं असं पौष्टिक फळ खजूर

iStock

खमंग काकडी

साहित्य: मोठी काकडी बारीक चिरलेली, 4 छोटे चमचे दाण्याचा कूट, नारळाचा चव, हिंग, मिरची बारीक चिरून, चवीनुसार मीठ आणि साखर, लिंबाचा रस, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: काकडीमध्ये दाण्याचा कूट, मीठ, साखर,लिंबाचा रस, कोथंबीर सगळं घालून एकजीव करावं. छोट्या कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करायला ठेवा. तेल चांगलं गरम झाली की त्यामध्ये हिंग मोहरी आणि मिरचीची खमंग फोडणी करावी. तयार फोडणी काकडीच्या मिश्रणामध्ये घालावी. छान कालवून एकजीव करावं. सुंदर चवीची खमंग काकडी तयार होते.

हेही वाचा: Low Calorie Sandwiches : वाढत्या वजनाने तुम्हीही चिंतेत आहात? मग, खा 'हे' मसाला सँडविच

iStock

टोमॅटो कांदा कोशिंबीर

साहित्य: दोन मध्यम आकाराचे पिकलेले, छान चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ताजं गोडसर दही, चवीनुसार मीठ आणि साखर, जिरेपूड, कोथिंबीर, तुपाच्या फोडणीचे साहित्य कृती: दही फेटून त्यात मीठ, साखर आणि जिरे पूड घालून कालवून घ्या. त्यात कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घालून नीट एकत्र करा. फोडणीच्या पळीत तूप तापवून त्यात जिरे-मोहरी-हिंग-हळद-मिरची घालून खमंग फोडणी करून ती टोमॅटो कांद्याच्या मिश्रणावर घाला. कोशिंबीर तयार आहे.

हेही वाचा: Marathi Street Food: नाव काढताच तोंडाला पाणी सुटेल असं खास मराठी स्ट्रीट फूड

iStock

गाजराची कोशिंबीर

साहित्य: दोन मोठी लाल किसलेली गाजरं, थोडी कोथिंबीर, एक मोठा चमचा दाण्याचा कूट, मूठभर नारळाचा चव, साखर-मीठ चवीनुसार आणि तेलाची फोडणी. कृती: गाजराच्या कीसात सगळं साहित्य छान कालवून घ्या. तेल कडकडीत करून हिंग-हळद-जिरे-मोहरी आणि मिरचीची फोडणी करा आणि त्या मिश्रणावर घाला. कोशिंबीर तयार आहे. (लिंबाच्या रसाऐवजी दही घालूनही कोशिंबीर करता येते.)

हेही वाचा: New Year 2025 : गाजराचा हलवा बनवून पहिल्या दिवशी साजरा करा खास अंदाजात

iStock

मुळयाची कोशिंबीर

साहित्य: दोन मध्यम आकाराचे किसलेले मुळे, अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ-साखर चवीनुसार, लिंबाचा रस आणि कोथिंबीर कृती: मुळयाचा कीस हाताने दाबून पाणी काढून टाका. या कीसात सगळं साहित्य एकत्र करून नीट मिसळून घ्या. कोशिंबीर तयार आहे. हवी असेल तर फोडणी घाला. ही कोशिंबीर लिंबाच्या रसाऐवजी दही घालूनही छान लागते.

हेही वाचा: संपूर्ण भारतात बिर्याणीचे ८ सर्वात लोकप्रिय प्रकार तुम्हाला माहिती आहे का ?

iStock

बिटाची कोशिंबीर

साहित्य: एक मोठे बीट साल काढून, दही, मीठ, साखर चवीनुसार, फोडणीचे साहित्य कृती : कच्च्या बिटाचे साल काढून ते किसून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका भांड्यात किसलेले बीट घेऊन त्यात मिरच्या घाला. नंतर त्यात फेटालेलं दही आणि चवीनुसार मीठ, साखर घालावी. त्यावर तूप- जिऱ्याची फोडणी घाला. बिटाची कोशिंबीर तयार आहे.

हेही वाचा: प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत असे ५ पदार्थ, घरगुती स्वयंपाकातील महत्त्वाची टीप

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.