बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज विद्या 46 वर्षांची झाली आहे. विद्या बालनचा आज (1 जानेवारी)ला वाढदिवस (Birthday) आहे. विद्या बालनला बॉलिवूडमध्ये 'परिणीता' म्हणूनही ओळखले जाते. अलिकडेच अभिनेत्रीचा 'भूल भुलैया ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला.
अभिनेत्री बालनचा जन्म केरळमध्ये झाला. मात्र तिचे बालपण मुंबईत गेले. विद्या बालनला तिच्या कामासाठी अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
विद्या बालन संपत्तीविद्या बालनला 'परिणिती' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. तुम्हारी सुलु आणि बेगम जान हे चित्रपट खूप हिट झाले आहेत. तिचा सर्वाच हिट झालेला चित्रपट म्हणजे अभिनेता अक्षय कुमारसोबतचा '' (Bhool Bhulaiyaa 3) होय. विद्या बालन चित्रपटासोबत ब्रँडमधूनही कमाई करते. ती अनेक कनेक्ट आहे. तिच्याकडे लग्जरी गाड्या आणि आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विद्या बालन जवळपास 136 कोटींची मालकीण (Net Worth) आहे. तिचे तब्बल 14 कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट आहे. तसेच तिचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. अभिनेत्री विद्या बालनकडे मर्सिडीज, सेडान यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. विद्या बालनच्या चित्रपटासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.