शेअर बाजारात तेजी परतली! निफ्टी 24 हजाराच्या पुढे तर सेन्सेक्समध्ये 1,436 अंकांनी वधारले
मुंबई : गुरुवारी (2 जानेवारी 2025) निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये एक मजबूत तेजी दिसून आली. बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली आणि आजच्या सत्रानंतर जोरदार वाढीसह दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला. आजच्या सत्रात बेंचमार्क निर्देशांक रेंजमधून बाहेर पडल्यानंतर ब्रेकआउट देताना दिसला. निफ्टी 445 अंकांनी वाढून 24,188 वर बंद झाला. सेन्सेक्स 1436 अंकांनी वाढून 79,943 वर बंद झाला. निफ्टी बँक 544 अंकांनी वाढून 51,605 वर बंद झाला.आज निफ्टीवर ऑटो निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 2 टक्के आणि ऑटो निर्देशांक सुमारे 4 टक्क्यांनी वाढले या व्यतिरिक्त बजाज फायनान्स, सुंदरम फायनान्स सारख्या शेअर्सने निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा देखील मोठा आधार मिळाला. सर्वाधिक वधारलेले शेअर्सआयशर मोटर्स +9%, बजाज फिनसर्व्ह +8%, बजाज फायनान्स +6% आणि मारुती सुझुकी +6% वाढीसह निफ्टी 50 बंद झाला.इंडिनय ऑइल केमिकल्स आणि फार्मा +4%, एनडी+2.5% आणि डीसीएक्स +2.5%, सुंदरम फायनान्स +10%, चोलामंडलम फायनान्शियल +7%, क्रेडिट एक्सेस ग्रामीण +7% आणि सामना कॅपिटल +6% या शेअरनेही मजबूत नफा नोंदविला. घसरण झालेले शेअर्सनिफ्टीवर सन फार्मा -0.7%, ब्रिटानिया इंडस्ट्रीज -0.2% घसरले. पेट्रोनेट एलएनजी -6%, व्ही गार्ड इंडस्ट्रीज -4%, सुझलॉन -4% आणि बलरामपूर चिनी -4% हे शेअर्स देखील घसरणीमुळे बातम्यांमध्ये होते. जागतिक बाजारआज जागतिक बाजारातून मिळणारे संकेत देशांतर्गत शेअर बाजारासाठी कमजोर दिसत होते. आजच्या व्यवहारासाठी बहुतांश आशिया बाजार बंद आहेत. गुरुवारी सकाळी अमेरिकन फ्युचर्स सुस्त दिसत आहेत. याआधी मंगळवारी अमेरिकन बाजार लाल रंगात बंद झाले होते. मंगळवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 30 अंकांची कमजोरी होती आणि तो 42,544.22 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite मध्ये 176 अंकांची कमजोरी होती आणि तो 19310.79 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक 25 अंकांनी घसरला आणि 5881.63 च्या पातळीवर बंद झाला.