चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यावर पूर्वी आपल्याला काचेचे ग्लॅस किंवा काचेच्या कपमध्ये चहा दिला जात होता. पण आता या काचेचे ग्लॅस आणि कपची जागा प्लास्टिक आणि कागदी कपांनी घेतली आहे. यूज अँड थ्रो असलेले हे प्लास्टिक आणि कागदी कप वापरासाठी सोपे असले आणि त्यामुळे आपली मेहनत कमी होत असली तरी देखील हेच कप आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. असामध्ये याच कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्याचे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत.
कागदी तसंच प्लास्टिक कपावर बंदी घालावी यासाठी आझाद हिंद संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हे आदेश काढले आहेत. चहाचे कप बनविताना त्यामध्ये बीपीए नावाचे केमिकल वापरले जाते आणि हे केमिकल आरोग्याला हानिकारक असून त्यामुळे कॅन्सरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कपांवर बंदी घालण्याची मागणी आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आली होती.
कागदी प्लास्टिक कप यासह प्लास्टिक वस्तूवर बंदीचा कायदा तर शासन प्रशासनाचे आदेश आहेच तरीही महाराष्ट्रात राजेरोसपणे चहाचे कागदी कप आणि प्लास्टिक द्रोण, पत्रवळ्या, प्लेट्सची विक्री आणि निर्मिती सुरू होती. बीपीए नामक केमिकल वापरणाऱ्या प्लास्टिकमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात कॅन्सर होत आहे. असंख्य नागरिकांचे जीव जात आहे. सदर गंभीर बाबीची दखल घेत आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी शासन प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. यासाठी वारंवार आंदोलन करत सातत्याने पाठपुरावा केला.
कागदी कपांचे सत्य जनजागृतीसाठी वास्तविक प्रात्यक्षिक दाखविताना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १३ सेकंदाच्या या व्हिडीओला 24 तासांत लाखो व्ह्यूज मिळाले. तर काही नेटकरी, सुज्ञ नागरिकांनी दारू, गुटखा, चहाची पत्ती, दुधाची बॅग, पत्रवाळ्या, खाद्यपदार्थ पॅकिंग प्लास्टिक या अनुषंगानेही कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ज्यावरून प्लास्टिक वापर आणि चहाच्या कागदी कपांबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकते बरोबर जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्लास्टिक वितळल्यामुळे एकावेळी 25000 प्लास्टिकचे मायक्रोकन पोटात जात असल्यामुळे कॅन्सरचा आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेही व्हिडिओची दखल घेतली गेली. या व्हिडिओमुळे शासन प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळेही शासन प्रशासन अलर्ट मोडवर आले. त्यामुळे मागील काही दिवसांत प्रशासकीय यंत्रणांनी सर्व विभाग प्रमुखांना कारवाई करण्याचे पत्र पाठवले.
कागदी प्लास्टिक कप यासह प्लास्टिक वस्तूवर बंदीला सुरूवात महाराष्ट्रातील प्रथम सुरूवात बुलडाणा जिल्ह्यापासून झाली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगर विकास, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आदी विभागांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व तालुक्यातील प्रमुखांना कागदी कप आणि प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे सूचनापत्र निर्गमित केले.
त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात चहाच्या कागदी कपांसह प्लास्टिक वर बंदीची कारवाई सुरू झाली. या आदेशानंतर आता चहा विक्रेते आणि ग्राहकांनी सुद्धा कागदी कप बाजूला सारले. ग्राहक आणि चहा विक्रेते यांनी शासन प्रशासनाच्या निर्णयाचे आणि ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या आंदोलनाचे स्वागत केले.