सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशातून दर्शनासाठी येत असतात. यात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो भाविक दाखल झाले होते. या भाविकांकडून साई चरणी भरभरून दान टाकण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारे भाविकांकडून मागील नऊ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे.
च्या साईबाबांचे भक्त देश- विदेशात आहेत. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून या भाविकांकडून दान देखील करण्यात येत असते. काही भाविक सोने- चांदीचे दागिने अर्पण करतात. तर काही भाविक रोख रक्क्मेस्वरूपात दान देत असतात. दरम्यान नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून साईबाबांना भरभरून दान देण्यात आले आहे. अजून देखील भाविकांची गर्दी असून दान देणे सुरूच आहे.
१६ कोटी ६१ लाखांचे दान
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून मागील ९ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. हे दान २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत कोट्यवधींचे दान झाले आहे. याशिवाय आजून देखील भाविकांची गर्दी कायम असून दूरवरून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. यामुळे साईचरणी येणाऱ्या देणगीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशी आली दान स्वरूपात रक्कम
२५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान साधारण ६ लाखांहून अधिक भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. साईबाबांना देण्यात आलेल्या देणगीत दानपेटीत ६ कोटी १२ लाख मिळाले. तर देणगी काऊंटरवर ३ कोटी २२ लाख जमा झाले आहेत. ऑनलाईन देणगी चेक, डीडी, मनी ऑर्डर, डेबिट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ कोटी ६५ लाख मिळाले. तर ५४ लाख ५० हजार रुपयांचे सोने. ९ लाख ९३ हजार रुपयांची चांदी. सशुल्क देणगी पासच्या माध्यमातून १ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत.