विनोद जिरे, साम टीव्ही प्रतिनिधी
Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. या प्रकरणात फरार असणाऱ्या तिन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. वाल्मीक कराड याआधीच पोलिसांना शरण आला होता. तिन्ही फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. १५ दिवसांच्या आत त्यांना अटक करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. आठवडाभरातच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्याचे समजतेय.
मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सात आरोपींचा हात असल्याचं सांगितलं जातेय. यातील कथित मास्टरमाईंड वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र इतर तीन आरोपी फरार होते. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ पैकी २ आरोपींना पकडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती दिली आहे. तर अन्य एकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती. काही वेळात पोलीस अधीक्षक पत्रकारांशी साधणार संवाद आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती दिली आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याचं समजतेय. पण पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये घुले आणि सांगळे यांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी एकाला अटक केली आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेतलेय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात नेमकं कोणाला अन् आरोपींना पकडले हे स्पष्ट होईल.
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरंपच पती संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर गावात आणि बीडमध्ये शोक व संतापाची लाट उसळली. या हत्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलने झाली. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय मूक मोर्चा या प्रकरणाचा एक महत्त्वाचा भाग ठरला, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येतील दोषींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वाल्मीक कराड यानं सरेंडर केलं. त्यानंतर आता तिन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.