गुन्हा करा: पिंपरी चिंचवडमधील एका रिक्षा चालकाने सावकारांकडून कर्ज घेतलं अन् त्याच्या आयुष्याचा मीटर फिरला. या सावकारांनी केलेला जाच व्हिडीओद्वारे मांडला अन गळफास घेऊन जीवन संपवलं. राजू राजभर या रिक्षा चालकाने शुक्रवारीच्या (3 जानेवारी) हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, यावेळी राजू राजभर यांनी सुसाईड नोट देखील लिहिली आहे. निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला
अधिकची माहिती अशी की, राजू यांनी हनुमंता गुंडे, महादेव फुले, राजीव कुमार आणि रजनी सिंह या चौघांकडून कर्ज घेतलं अन दहा टक्क्यांनी ते फेडायचं ठरलं. अडीच वर्षांपूर्वी घेतलेलं हे कर्ज फेडण्यासाठी राजू रिक्षावर घाम गाळू लागले. पण काही केल्या कर्ज फिटत नव्हतं. या चार ही सावकारांनी हिशोबात मोठा घोळ घातला अन पैसे रोख घेत, त्याच्या नोंदी ही टाळल्या. पैश्यांसाठी ससेमिरा सुरुचं राहिला, परिणामी इतर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याची वेळ आली.
या कर्जातून ते कर्ज फेडण्याचं त्यानी ठरवलं पण इथंच ते फसत गेले. कर्जाचा फास आळवत गेला पण या सावकारांचे कर्ज काही फिटलं नाही. शेवटी राजू यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी रिक्षात बसूनचं झालेला जाच व्हिडीओद्वारे समाजासमोर मांडायचा निर्णय घेतला अन् कर्जाचा फास त्यांच्या गळ्याभोवती कसा आळवला गेला, हे सांगितलं आणि पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागितली. मंजू मला माफ कर, मुलांनो घरात बनेल ते खा, आईला त्रास देऊ नका, असं आवाहनही केलं.
पुढे बोलताना राजू राजभर म्हणाले, कर्जाच्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी बरेच प्रयत्न केले, अनेकांनी मला साथ ही दिली, बरंच संजवलं ही पण आता मी हरलोय, हे सांगताना राजूंनी अश्रू ढाळत व्हिडीओ थांबवला. हे सगळं सुसाईड नोटमध्ये ही नमूद केलं अन घरातल्या खोलीत जाऊन भर दिवसा गळफास घेतला. तेव्हा पत्नी, मुलगा आणि मुलगी घरातच होते. दुपारी खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न झाला अन् ही धक्कादायक बाब समोर आली. निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच राजीव कुमार आणि रजनी सिंह यांना बेड्या ही ठोकल्यात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..