धनंजय मुंडेंमुळं पक्ष अडचणीत येणार असेल तर अजित पवार… छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Marathi January 05, 2025 09:24 AM

छगन भुजबळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. या सर्व चर्चांवर छगन भुजबळ यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मी भाजपमध्ये जाणार? मी नाराज आहे, हे सगळं सोडून द्या असे भुजबळ म्हणाले. कुणाचे मंत्रिपद जाऊन मला मिळावे अशी इच्छा मी जन्मातही करत नाही असंही ते म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांची चौकशी होईल आणि जे काय करायचे ते करतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. मला कुणाच्याही राजीनाम्याची घाई करायची गरज नाही. धनंजय मुंडे यांच्यामुळं पक्ष अडचणीत येणार असेल तर अजित पवार पाहतील असेही भुजबळ म्हणाले. ते नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पवार कुटुंबाने एकत्र यावं तसेच ठाकरे कुटुंबाने देखील एकत्र यावं

पवार कुटुंबाने एकत्र यावं तसेच ठाकरे कुटुंबाने देखील एकत्र यावं यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. मला कुणाचाही फोन आला नाही. कुणीतरी फोन करणार ही मीडियामधील चर्चा असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत भुजबळांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपमध्ये जाणार? मी नाराज आहे, हे सगळं सोडून द्या असे भुजबळ म्हणाले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर देखील भुजबळांनी वक्तव्य केलं.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या वाल्मिक कराड यांना चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी देखील सुरु आहे. पण हे वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळं विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली  जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. हा मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मांडला. त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.