Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
Saam TV January 05, 2025 04:45 PM

मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ०५/०१/२०२५ रोजी आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येऊन शीव, कुर्ला, , विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचेल.

येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व यादरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील व पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचेल.

पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट लाईन वगळता)पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी भागावर विशेष चालतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. मेगाब्लॉक हा पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. विनंती करण्यात येत आहे की रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.