मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका. जर तुमच्यात खरोखर दम असेल, तर कुठे घुसायचं ते सांगा," अशी चिथावणीखोर टिप्पणी करत हाके यांनी संताप व्यक्त केला. अशा वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तींच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हाके यांनी केली आहे.
कोयना परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणकोयनानगर परिसरात आज सकाळी 6:56 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रतेचा हा धक्का नोंदवण्यात आला असून, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किमी अंतरावर होता. गोषटवाडी गावाच्या नैऋत्येला सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रबिंदूची खोली 7 किलोमीटर इतकी असल्याचे समजते. या सौम्य धक्क्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली, तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Maharashtra: आरोग्य मित्र करणार काम बंद आंदोलनआरोग्य मित्रांना वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा आरोग्य मित्र संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न दिल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Live: गोडाऊनच्या आगीत चित्रीकरणाची वाहने खाकमालाड पश्चिमेतील धारवली डोंगरपाढा येथे गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत चित्रीकरणाची दोन वाहने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करीत आग आटोक्यात आणली. सध्या या प्रकरणाचा तपास मालवणी पोलिस करीत आहेत.
Nagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणारनागपूर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार
- राज्यातील वाहतूक सुविधा बळकटी करणात भर पडणार...महाराष्ट्र रेलकडून निर्माण केलेल्या राज्यभरातील सात उडाणपूलाच लोकार्पण होणार..
- रामदास पेठ परिसरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर होणार लोकार्पण सोहळा.
Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला मिळणार गतीडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला आता गती मिळणार
- वायुदलाकडील जमीन नवीन जागेवर स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले
- जिल्हाधिकारी तथा एमएडीसी चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. इटनकर यांनी भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली