बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
GH News January 06, 2025 02:12 PM

चीनमधील धोकादायक व्हायरस भारतातही पोहोचला आहे. एचएमपीव्हीचा (HMPV) पहिला रुग्ण बंगळुरूत आढळला आह. सध्या चीनमध्ये HMPV विषाणू खूप वेगाने पसरत असून या रोगाने त्या देशात थैमान घातलं आहे. अनेक भागात परिस्थिती बिकट झाली असून वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता भारतातही या विषाणूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला HMPV या खतरनाक व्हायरसची लागण झाली असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतातही या व्हायरसने प्रवेश केल्याने चिंतेचे वातावरण आहे.

याच दरम्यान HMPV आणि श्वसन संक्रमणांशी संबंधित इतर संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी, तो रोग रोखण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. रविवारी झालेल्या बैठकीनंतर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, (आरोग्य सेवा) महासंचालकडॉ वंदना बग्गा यांनी रविवारी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि आयडीएसपीचे राज्य कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेतली. दिल्लीतील श्वसनाच्या आजारांना सामोरे जाण्याच्या तयारीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

HMPV हा एक मोठा आजार म्हणून समोर येऊ शकतो आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची लागणी होऊ शकते. या आजारावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस नाही. त्यामुळे याचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी, भारतात त्याचा जास्त फैलाव होऊ नये यसाठी सावधगिरी दाखवत दिल्ली सरकारने यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

काय आहेत सूचना ?

या बैठकीतील शिफारसींनुसार, इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) चे कोणतेही प्रकरण समोर आल्यास IHIP ( Integrated Health Information Platform ) पोर्टलद्वारे त्याची माहिती त्वरित कळवावी, असे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. कोणीही संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाइन करण्यात यावे आणि योग्य ती खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावे. तसेच तीव्र श्वसन संसर्गाने ग्रस्त असतील अशा रुग्णांचे डॉक्यूमेंटेशन करणेही बंधनकारक आहेय असलेल्या व्यक्तीचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे.

हॉस्पिटलमध्ये ही औषधे असलीच पाहिजेत

या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची असलेली औषधे असलीच पाहिजेत, अशीही सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, पॅरासिटीमॉ, अँटीहिस्टामाईन आणि कफ सिरपचा समावेश असल्याचे समजते.

HMPV व्हायरसची लक्षणं काय ?

कोरोना सारखे लक्षण

ताप आणि खोकला

श्वास घ्यायला त्रास

फुफ्फुसात संक्रमण

नाक बंद होणं

गळ्यात घरघर होणे

संसर्गजन्य रोग असून तो (लोकं) संपर्कात आल्याने फैलावतो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.