सोन्याचा भाव: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. कारण, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचवेळी, सलग दोन दिवसांत चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दराने 3 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये डॉलर निर्देशांकात 0.30 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात वाढ
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी नवीन खरेदी केल्यामुळे आणि रुपयाच्या घसरणीमुळे देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 79,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोमवारी सोन्याचा दर हा 79,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव सोमवारी 700 रुपयांनी वाढून 79,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मागील बंद पातळी 78,600 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मंगळवारी चांदीचा भाव 1,300 रुपयांनी वाढून 92,000 रुपये प्रति किलो या तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मागील सत्रात चांदी 90,700 रुपये प्रति किलोवर बंद झाली होता.
परदेशातील बाजारपेठेतील मजबूत कल आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सराफा किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि विदेशी निधीचा प्रवाह स्थानिक युनिटवर तोलत राहिल्याने मंगळवारी रुपया 5 पैशांनी घसरून 85.73 (तात्पुरत्या) वर बंद झाला आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. कारण सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
MCX वर फ्युचर्स ट्रेडमध्ये, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 122 रुपये वाढून 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फ्युचर्स ट्रेडमध्ये मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही 551 रुपयांनी वाढून 91,105 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवरील सोन्याचे भाव 0.28 टक्क्यांनी वाढलेत. कॉमेक्स सिल्व्हर फ्युचर्स आशियाई ट्रेडिंग तासांमध्ये 0.73 टक्क्यांची वाढ झालीय. गेल्या आठवड्याच्या महागाईच्या आकड्यांशी NFP डेटा कसा तुलना करतो यावर व्यापाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणावर अवलंबून असते. फेडने व्याजदर दर कमी केल्यास त्याचा सोन्याच्या किमती आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
अधिक पाहा..