नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दोघंही पूर्णपणे फ्लाॅप ठरले. त्यामुळे त्यांच्या कसोटी कारकिर्दीवर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गेल्या 6 महिन्यांतील संघाच्या खराब कामगिरीचा सखोल आढावा घेत सांगितले की, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भविष्य आता पूर्णपणे निवडकर्त्यांच्या हातात आहे.
माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, “आता भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे, तेव्हा असे का झाले याचा विचार करणे योग्य ठरेल. डब्ल्यूटीसीच्या स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे की भारत फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही. रविवारी संपलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागल्याने तो फायनलमधून बाहेर पडला.”
भारतीय संघाच्या फलंदाजांच्या वारंवार अपयशाकडे लक्ष वेधून गावस्कर म्हणाले की, “गेल्या सहा महिन्यांत आमची फलंदाजी अपयशी ठरली. हे स्पष्ट आहे आणि हेच मुख्य कारण आहे की, आम्ही जे सामने जिंकायला हवे होते तेही आम्ही गमावले. त्यामुळे इंग्लंडमध्ये जूनमध्ये सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या नव्या चक्रासाठी संघात बदल करण्याची गरज भासल्यास 2027च्या फायनलपर्यंत कोणता खेळाडू संघात राहील याकडे निवडकर्त्यांचे लक्ष असेल अशी आशा आहे. नंतर त्यानुसार निवड होईल.”
गावस्कर यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसून काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून आता त्यांना योग्य संधी देण्याची जबाबदारी निवडकर्त्यांवर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतील हे आम्हाला कसे कळणार, जोपर्यंत त्यांना संधी दिली जात नाही?”
महत्त्वाच्या बातम्या-
WPL 2025; कधी आणि कुठे होणार महिला प्रीमियर लीगचे सामने?
मोहम्मद शमीच्या दुखापतीचे कारण काय? माजी दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न
Champions Trophy; अफगाणिस्तानविरूद्ध नाही खेळणार इंग्लंड? ईसीबीने सांगितले कारण