TMKOC Sodhi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते गुरुचरण सिंह यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुचरण सिंह यांचा रुग्णालयातला व्हिडीओ समोर आला आहे. यात गुरुचरण यांची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गुरुचरण सिंह हे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
गुरुचरण सिंह यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी चाहत्यांनी तब्येतसंबंधित माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये गुरुचरण च्या बेडवर बसल्याचे पाहायला मिळते. ते फार अशक्त दिसत आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये 'माझी अवस्था खूप खराब झाली आहे, सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत', असे म्हटले आहे.
दरम्यान या व्हिडीओमध्ये गुरुचरण सिंह यांनी आजारपणाचे कारण सांगितले नाही. लवकरच ते कारण चाहत्यांना लवकरच सांगेन असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुचरण यांची बिघडल्याने त्यांचे चाहते चिंतातूर झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट करत त्यांची विचारपूस केल्याचे पाहायला मिळते.
मागच्या वर्षी गुरुचरण सिंह अचानक राहत्या घरातून गायब झाले होते. तब्बल २५ दिवसांनी ते घरी परतले. या २५ दिवसांमध्ये ते कुठे होते याची माहिती कुणालाही नव्हती. त्यांच्या वडिलांना पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. गुरुचरण यांच्यावर कर्ज होते. पैसे फेडणे शक्य होत नसल्याने तणावाखाली ते घर सोडून गेले होते.