Box Office Queen : कोणताही हिरो नाही तर बॉक्स ऑफिसवर राज्य करते 'ही' क्वीन ; आतापर्यंत केलीये 10,000 कोटींची कमाई !
esakal January 08, 2025 11:45 PM

Bollywood Entertainment News : असं म्हणतात भारतीय सिनेविश्व हा जगातील सगळ्यात जास्त पैशांची उलाढाल होणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. सिनेमांचं यश ठरत ते त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून. त्यावरूनच सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांची आणि अभिनेत्रीची नावंही ठरतात. पण तुम्हाला माहितीये का ? बॉलिवूडमध्ये पुरुषांची सत्ता चालते असं म्हणत असताना एक बॉलिवूड अभिनेत्रीच बॉक्स ऑफिसवर राज्य करते. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.

बॉक्स ऑफिसवर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे दीपिका पदुकोण. तिच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने सलमान, आमिर, शाहरुख, अल्लू अर्जुन, प्रभास, यश यांसारख्या दिग्गजांनाही पराभूत केलं आहे. सगळ्या दिग्गजांना धोबीपछाड देणाऱ्या दीपिकाची कमाई जाणून घेऊया.

दीपिकाच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आजवर थोडे थोडके नाही तर तब्बल दहा हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉलिवूडचे खान यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही खूप आहे पण ते दीपिकाला मात देऊ शकले नाहीयेत. शाहरुख, आमिर आणि सलमान खानने बॉक्स ऑफिसवर 7000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अनेक भाषांमध्ये सुपरहिट सिनेमे देऊन तिने दिग्गज कलाकारांमध्ये तिचं स्थान पक्कं केलं आहे.

दीपिकाने जागतिक बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 10200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिने भारतीय सिनेमांमधून 8000 कोटींची कमाई केली आहे तर तिचा एकमेव हॉलिवूड सिनेमा XXX 2200 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. अनेक मोठ्या स्टार्स बरोबरच नाही तर तिने एकटीच्या हिंमतीवर पद्मावत सारखा सुपरहिट सिनेमा दिला आहे.

2023 आणि 2024 मध्ये तिच्या मेगा रिलीजनंतर ती बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री बनली. पठाण, जवान आणि कल्की या तिच्या तीन सिनेमांनी 1000 हुन अधिक कमाई केली आहे तर फायटर आणि सिंघम अगेन या सिनेमांनी 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिच्या तुलनेत प्रियांका चोप्रा आणि कतरीना कैफ खूप मागे आहेत.

लवकरच दीपिका कल्की 2 आणि ब्रम्हास्त्र 2 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ब्रम्हास्त्र 2 मध्ये ती अमृता ही भूमिका साकारणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.