सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
GH News January 06, 2025 02:12 PM

कोरोनासारखा महाखतरनाक व्हायरस देणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एक व्हायरस निर्माण झाला आहे. हा व्हायरस अत्यंत खतरनाक आहे. या व्हायरसने बंगळुरूत दस्तकही दिली आहे. चीनच्या HMPV या महाखतरनाक व्हायरसची लागण बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला झाली आहे. ताप आल्याने या बाळाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर त्याच्या शरीरात एचएमपीव्ही व्हायरस असल्याचं निदान झालं. बंगळुरूच्या लॅबने ही पुष्टी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, चीनचा हा महाभयंकर व्हायरस भारतात आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरस अत्यंत वेगाने पसरत आहे. त्याचा प्रकोप पाहून चीनच्या अनेक राज्यात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. चीनच्या अनेक भागातील परिस्थिती बिघडली आहे. नवा व्हायरस वेगाने पसरत असल्याने चीनमध्ये पुन्हा एकदा मास्क लावणे सुरू झालं आहे. हजारो लोक या व्हायरसने ग्रासले आहेत. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या व्हायरसची लागण वेगाने होत आहे. चीनच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांच्या वॉर्डात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे लहान मुलांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून येत आहे.

चीनकडे भारताचं लक्ष

चीनमधील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे. या व्हायरसमुळे भारत सरकार अलर्ट झाले आहे. सरकारने एचएमपीव्हीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. श्वसन आणि इन्फ्लुएंजा संबंधित आजारावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. तसेच अधिकाधिक लॅब सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ICMR संपूर्ण वर्षभर HMPV व्हायरसच्या निष्कर्षांची समीक्षा करणार आहे.

भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल निगराणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेलाही ताजी माहिती देत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपण या नव्या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहोत, असंही सरकारने स्पष्ट केलंआहे.

HMPV व्हायरसचे लक्षण

कोरोना सारखे लक्षण

ताप आणि खोकला

श्वास घ्यायला त्रास

फुफ्फुसात संक्रमण

नाक बंद होणं

गळ्यात घरघर होणं

संसर्गजन्य रोग, संपर्कात आल्याने फैलावतो

HMPV काय आहे?

एचएमपीव्ही व्हायरस गेल्या अनेक दशकांपासून आहे. यूएस सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, 2001मध्ये पहिल्यांदा नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळला. श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांच्या सँपलमधून या आजाराची माहिती मिळाली. हा व्हायरस सर्व ऋतूत असतो. संसर्ग झालेल्या लोकांच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हा व्हायरस पसरतो. हिवाळ्यात हा आजार अधिक फैलावतो. 1958 मध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर फैलावला होता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.