Aajche Rashi Bhavishya (आजचे राशीभविष्य, 06 जानेवारी 2025): 'या' राशींसाठी आजचा दिवस नोकरी-व्यवसायासाठी उत्तम! वाचा एका क्लिकवर
मेष - आजचे राशीभविष्य / Aries Horoscope Today
गुरु वृषभ आणि चंद्र मीन राशीत आहे. आज अनेक रखडलेले काम पूर्ण होतील. आपले काम आनंदाने करा. व्यवसायात नफा होईल. प्रेम जीवनात जास्त भावनिक होणे टाळा, कारण तुमचे करियर देखील महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. कार्यालयात काही नवीन सहकारी जुळू शकता. नोकरीत बढतीसाठी सुंदरकांडाचा पाठ करा.
- आजचा उपाय - महादेवाची उपासना करा. शिवलिंगावर जलाभिषेक व बेलपत्र अर्पण करा.
- शुभ रंग - केशरी आणि लाल.
- शुभ अंक - 01 आणि 09.
वृषभ - आजचे राशीभविष्य/ Taurus Horoscope Today
गुरु तुमच्या राशीत आणि चंद्रमा कुंभ राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात नवीन कामाची संधी मिळू शकते. कुटुंबात वाद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुक्र प्रेम संबंधांमध्ये मधुरता आणेल. नोकरीत काही रखडलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. विद्यार्थ्यांना करिअरबद्दल चिंता वाटू शकते.
- आजचा उपाय - श्री सुंदरकांडाचा पाठ व उडीदचे दान करा.
- शुभ रंग - निळा आणि पांढरा.
- शुभ अंक - 03 आणि 07.
मिथुन- आजचे राशीभविष्य / Gemini Horoscope Today
बुध व शुक्र शुभ आहेत. व्यवसायासाठी उत्तम वेळ आहे. कुटुंबातील वाद पुढे जाऊ नयेत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. रखडलेले महत्त्वाचे सरकारी काम पूर्ण होईल. प्रेम जीवनाबद्दल चिंता वाटेल. धावपळ सुरू राहील. युवकांनी प्रेम जीवनात जास्त भावनिक होऊ नये.
- आजचा उपाय - श्री सूक्ताचा पाठ करा आणि डाळींब दान करा.
- शुभ रंग - निळा आणि जांभळा.
- शुभ अंक - 05 आणि 08.
कर्क- आजचे राशीभविष्य / Cancer Horoscope Today
चंद्र नवव्या घरात आहे. शनी कुंभ राशीत आहे. गुरु अकराव्या घरात आहे. व्यवसायात नवीन कार्य सुरू करण्याच्या प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याची स्थिती राहील. विद्यार्थ्यांना करिअरच्या यशासाठी सातत्याने अभ्यास करावा लागेल. प्रेम जीवनात तणाव जाणवेल.
- आजचा उपाय - महादेवाची उपासना करा. शनि व राहू संबंधित द्रव्य तीळ आणि उडीदाचे दान करा.
- शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.
- शुभ अंक - 05 आणि 07.
सिंह - आजचे राशीभविष्य / Leo Horoscope Today
सूर्यामुळे राजकीय लाभ मिळेल. चंद्र मीन राशीत शुभ आहे. व्यवसायात काही विशिष्ट करारामुळे तणाव होऊ शकतो. मोठ्या भावाची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना कधी-कधी करिअरबद्दल असंतुष्टता वाटू शकते. प्रेम जीवन सुधारण्यासाठी लाँग ड्राईव्हवर जा. आपल्या उर्जेचा योग्य वापर करा आणि योग्य दिशेने कार्य करा. एकाग्रता वाढवण्यासाठी योग व ध्यान करा.
- आजचा उपाय - श्री आदित्यहृदयस्तोत्राचा 3 वेळा पाठ करा व मसूराचे दान करा.
- शुभ रंग - लाल व पांढरा.
- शुभ अंक - 04 आणि 07.
कन्या- आजचे राशीभविष्य / Virgo Horoscope Today
शनि कुंभ राशीत आहे, गुरु वृषभ आणि चंद्र मीन राशीत शुभ आहे. काही रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना गुणवत्ता, शिक्षण आणि वेळच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. नोकरीत तुमची कार्यशैली तुम्हाला यश देईल. व्यवसायात काही रखडलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल.
- आजचा उपाय - आरोग्य सुखासाठी अन्नदान करा. कुश व गंगा जलाने रुद्राभिषेक करा. हनुमान बाहुकाचा पाठ करा.
- शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
- शुभ अंक - 04 आणि 08.
तूळ - आजचे राशीभविष्य / Libra Horoscope Today
सूर्य तृतीय घरात आहे. चंद्रमा सप्तम, गुरु आठव्या घरात आणि शनी कुंभ राशीत आहे. नोकरीत सकारात्मक आणि आनंदी राहाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसायातील वेळेच्या व्यवस्थापनासाचे संतुलन साधणे गरजे आहे. प्रेम जीवन सुंदर आणि आकर्षक राहील. प्रवासामुळे मन प्रसन्न आणि तणावमुक्त राहाल. आरोग्य चांगले राहील.
- आजचे उपाय - पिंपळाच्या 7 परिक्रमा करा. तीळ व उडीद दान करा.
- शुभ रंग - निळा आणि हिरवा.
- शुभ अंक - 05 आणि 06.
वृश्चिक-आजचे राशीभविष्य / Scorpio Horoscope Today
आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरीत अडचणी दूर होतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नोकरी आणि व्यवसाय चांगले राहतील.
- आजचा उपाय - माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन एक परिक्रमा करा. धार्मिक पुस्तके दान करा.
- शुभ रंग - लाल आणि पिवळा.
- शुभ अंक - 03 आणि 07.
धनु - आजचे राशीभविष्य / Sagittarius Horoscope Today
गुरु आठव्या घरात आणि चंद्र चौथ्या घरात आहेत. नोकरीत तणाव राहील. व्यवसायात तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करत असाल तर एकाच वेळी एकच काम करा, नाहीतर कामांचा ताण होईल. मित्रांची मदत मिळू शकते.
- आजचा उपाय - घरात तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीपत्र श्रीहरी विष्णूला आर्पण करा. गाईला गूळ खाऊ घाला.
- शुभ रंग - पिवळा आणि लाल.
- शुभ अंक - 04 आणि 07.
मकर - आजचे राशीभविष्य / Capricorn Horoscope Today
गुरु आज वृषभ राशीत, शनी दुसऱ्या घरात आणि चंद्रमा तिसऱ्या घरात राहतील. नोकरीत थोडा तणाव असू शकतो. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, मेहनत आणि आत्मविश्वासाने मार्गक्रम करावे लागेल. अभ्यासाचा ताण टाळा. प्रेम जीवन चांगले राहील.
- आजचा उपाय - भगवान विष्णूची उपासना करा. शिवलिंगाली जलाभिषेक करा.
- शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
- शुभ अंक - 06 आणि 07.
कुंभ -राशीभविष्य / Aquarius Horoscope Today
आज गुरु तृतीय घरात, शनि कुंभ राशीत आणि चंद्रमा दुसऱ्या घरात राहतील. विद्यार्थ्यांना करिअरबद्दल थोडी चिंता होऊ शकते. नोकरीत मोठे काम किंवा प्रोजेक्ट हाताळताना नियोजनपद्धतीने काम करा. नियोजनाने काम केल्याने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. प्रेम जीवन आणि कार्यालयीन कामात संतुलन साधा.
- आजचा उपाय - घरातील देवघरात कुशावर बसून दुर्गासप्तशतीचा पाठ करा. फळांचे दान करा.
- शुभ रंग - निळा आणि आकाशी.
- शुभ अंक - 05 आणि 07.
मीन - आजचे राशीभविष्य / Pisces Horoscope Today
गुरु तृतीय घरात आणि चंद्र मीन राशीत राहतील. व्यवसायात आशावादी राहाल आणि आपली कार्यशैली योग्य दिशेने जाईल. मित्रांचा सहयोग तुमच्या यश मिळवण्यात मोठी मदत करेल. नोकरीत लवकरच बढती होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.
- आजचा उपाय - हनुमान बाहुकाचा पाठ करा आणि सात प्रकारच्या अन्नाचे दान करा.
- शुभ रंग - केशरी आणि पांढरा.
- शुभ अंक - 01 आणि 09.