Marathi Patrakar Din 2025 Wishes: आज पत्रकार दिन, लेखणीतून समाजाला दिशा दाखवणाऱ्या पत्रकारांना पाठवा येथे दिलेले शुभेच्छा संदेश
Times Now Marathi January 06, 2025 02:45 PM

Marathi Patrakar Din 2025 Wishes, Images, Quotes, Messages and Status in Marathi : दरवर्षी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) साजरा केला जातो. या दिवसाला दर्पण दिवस असे देखील म्हटले जाते. मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 'दर्पण' नावाने प्रकाशित केले होते. बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण' वृत्तपत्र सुरू केले. येथूनच मराठी पत्रकारीतेची पायाभरणी झाली आज रोजी मराठीतून शेकडो वृत्तपत्रे प्रकाशित होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Divas) म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने लोक पत्रकार बांधवांना शुभेच्छा (Marathi Patrakar Din 2025 Wishes) देतात. तुम्ही देखील येथे दिलेले संदेश पाठवून पत्रकारांना शुभेच्छा देऊ शकता...

सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन !
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना सलाम
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


-------------------------------------------------------


मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त शतश: प्रणाम
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा





मराठी पत्रकारितेचे जनक
'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीदिनी सादर विनम्र अभिवादन!
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा





मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी
मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक
''दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना नमन
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




मराठी पत्रकारितेचे जनक
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मराठी पत्रकार दिनाच्या सर्व
पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा



निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
ठाम राहून लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

-------------------------------------------------------


आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे
मौलिक कार्य करणाऱ्या पत्रकारांना
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !





पत्रकार दिन मुद्धित माध्यमांचे पत्रकार,
वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार
आणि व्हिडिओ जर्नलिस्ट बंधु-भगिनींना
मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.