Maharashtra Live Update: बस स्थानकावर बसने घेतला अचानक पेट, सुदैवानं जीवितहानी नाही
Saam TV January 06, 2025 02:45 PM
बस स्थानकावर बसने घेतला अचानक पेट, सुदैवानं जीवितहानी नाही

मोहोळ बस स्थानकात एका एसटी बसनं अचानक पेट घेतलाय. सांगोल्याहुन हैद्राबादकडे जाणारी बस मोहोळ बसस्थानकात थांबलेली असताना बसनं पेट घेतला. बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचा जीव बचावला आहे.

पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही - मंत्री दत्तात्रय भरणे

पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही, असं क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. त्यांनी केलेली ही स्तुति नेमकी अजित पवार की शरद पवारांसाठी होती. या बद्दल सध्या इंदापूरमध्ये चर्चेला उधाण आलंय.

शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का! द्वारकानाथ भोईर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

नवी मुंबई जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. द्वारकानाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. पालघर, मुरबाड, धुळेमधील पदाधिकार्यांनी प्रवेश केला आहे.

सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात झालाय. जुईनगर जवळील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात घडला आहे. चार ते पाच गाड्यांचा अपघात झाला असून, डंपर चालकानं ३ वाहनांना मागून धडक दिल्यानं हा अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर, ३ गाड्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोलणं टाळत, जहरी टीका केली आहे. गिरीश महाजन यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी, घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

मिरा भाईंदर मध्ये झालेल्या गोळीबारमधील शूटर फरार

मीरा भाईंदर गोळीबार प्रकरणातील शूटर फरार, मात्र मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेने केली अटक

मिरारोड मध्ये गुरुवारी रात्री १० च्या सुमारास एका अज्ञात इसम कडून गोळीबार करण्यात आला

यामध्ये शम्स अन्सारी उर्फ सोनू यांची हत्या झाली

मुख्य सूत्रधार आरोपी युसूफ आलम आणि सैफ अली खान आलं यांना अटक

खालापुरच्या पाताळगंगा MIDC मध्ये मोठी आग

० SPR कंपनीत अचानक आग

० आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट

० आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

० खोपोली नगरपालिका, पाताळगंगा MIDC आणि रिलायन्स कंपनी यांच्या फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी दाखल

० आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवित हानीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, ओबीसी बांधवांची मागणी

, हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक झाला आहे, परभणी येथील मूक मोर्चा दरम्यान मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत एकेरी भाषेत वक्तव्य करत रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना आर्वाच भाषेत बोलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कार्यवाहीची मागणी करत ओबीसी आंदोलकांनी पोलीस स्टेशन समोर ठीया मांडला होता.

उन्हाळी कांदा लागवडीला शेतकऱ्यांची सुरुवात

विहिरींची वाढलेली पाणी पातळी लक्षात घेता धुळे तालुक्यात उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे, कांदा उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असुन, शासनाने कांद्यास अपेक्षित दर दिला तर शेतकरी समाधानी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, धुळे तालुक्यातील कुंडाणे परिसरात उन्हाळी कांदा लागवडीस सुरुवात झाली असुन, कांदा लागवडीमुळे महिला मजुरांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे.

Maharashtra Live Update: नाशिकच्या मनमाडमध्ये सापडला आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू

नाशिकच्या मनमाड मध्ये सापडला आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू..

पुण्याहून झाले होते त्याचे अपहरण..

आज सकाळी मनमाड बस स्थानक परिसरात तो आढळला.

सध्या संकेत गुट्टे हा मनमाड पोलिसांच्या ताब्यात..

मनमाड पोलीस त्याची अधिक माहिती घेत आहे.

मनमाड पोलिसांनी त्याच्या घरच्यांना व पुण्याच्या सांगवी पोलिसांशी केला संपर्क

सांगवी पोलीस व घरचे लोक मनमाड कडे निघाले..

मनमाड पोलीस तासाभरानंतर अधिक माहिती देणार..

संतोष देशमुख यांची बहीण आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याकडून आरोपीला फाशीची मागणी Maharashtra Live Update: बीड पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असताना, आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई कधी करणार? महा विकास आघाडी मधील पदाधिकारी यांचा सरकारला प्रश्न. पुण्यात आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वाल्मीक कराड सह इतर आरोपींना फाशी द्या तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मोर्चे मधून मागणी करण्यात येत आहे महा विकास आघाडी मध्ये असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष संजय मोरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे शहे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी.. पृथ्वीराज चव्हाणमुख्यमंत्र्याचं हे अपयश आहे. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री हे आरोपी पकडण्यात उशीर का करत आहेत. सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करावी. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव शासकीय महापूजेला मुख्यमंत्री सिंदखेड राज्यात येणार..?

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे दरवर्षी 12 जानेवारीला साजरा होत असतो... यंदाही जन्मोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असतानाही प्रशासनाकडून कुठलीही तयारी दिसत नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या मोती तलावाला अद्यापही काटेरी झुडपे यांचा विळखा पडलेला असून अद्यापही साफसफाईचा या ठिकाणी पत्ता दिसत नाही.... तर राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाची शासकीय महापूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी यंदा पूर्ण होते की काय..? असं चित्र निर्माण झाला आहे अनेक वर्षांपासून जिजाऊ भक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंची जन्मोत्सवाचे महापूजा करावी अशी मागणी आहे मात्र यंदाही मागणी पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे

भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील शेतकऱ्याची तूर जळून खाक

भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील शेतकऱ्याची तूर जळून खाक

अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती..

प्रशासनाने मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी..

गौरखेडा गावातील कुलदीप ठाकरे नामक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

६ एकर शेती पैकी ४ एकरातील तुरीचे पीक जळून खाक

Maharashtra Live Update: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका, मेहकर तालुक्याच्या खंडाळा परिसरात शेतकरी चिंतेत

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वातावरण मोठा बदल झालाय, ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, तूर यासह फळ बागांवर मोठा परिणाम होताना दिसतोय.. मेहकर तालुक्याच्या खंडाळा परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाची फुले गळून पडत आहेत, तर तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.. पर्यायाने शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारणी करावी लागत असल्याने, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे आणि उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडलाय

Maharashtra Live Update: गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू

- गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा H5N1 ( बर्ड फ्ल्यु) ने मृत्यू झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय

- H5N1 हा पक्षांमध्ये आढळणार विषाणू आहे. मात्र वाघ व बिबटयांना यांची लागण झाल्याने खळबळ उडली आहे.

- H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

- सध्या गोरेवाड रेस्क्यु सेंटर ला 12 वाघ व 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना H5N1 लागण झाली नाही. मात्र संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डीस्टंटसिंग पळाली जात आहे

सांगली.. जीएसटीचा हजार कोटीचा टप्पा पार

सांगली जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात सलग तिसऱ्या वर्षी 1 हजार 84 कोटीचा टप्पा पार झाला आहे. यंदा आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यातच 1084 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. गतवर्षीपेक्षा 16 टक्क्यांनी जास्त महसूल गोळा झाला आहे. टक्केवारीनुसार राज्याच्या तुलनेतही जिल्ह्याचे संकलन जास्त आहे.

बच्चू कडूअजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जर नार्को टेस्ट केली तर भाजप बद्दल खरं माहिती पडेल, मात्र ते स्पष्ट आणि उघड बोलू शकत नाही... पण खरं तर हेच आहे दगा फटका हो गया खासगी लक्झरी बसला भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी चौका जवळ आज सकाळी सहा वाजता दरम्यान एका खासगी लक्झरी बसला भीषण आग लागली आहे

सातपुड्यातील दुर्गम भागात 29 हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 29 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले येऊ लागले आहे मात्र स्ट्रॉबेरी साठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगही नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादित स्ट्रॉबेरी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. सातपुड्यातील वातावरण स्ट्रॉबेरी साठी चांगले असून यातून आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असतो मात्र प्रक्रिया उद्योगही नसल्याने आणि बाजारपेठही नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत सातपुड्याची रसाळ स्ट्रॉबेरीला राज्य शासनाने मदतीचा हात देऊन मोठ्या शहरात बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या कंपन्यांना नंदुरबार जिल्ह्यात प्रोत्साहन दिल्यास आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे..

तळेगाव एमआयडीसी मधील तीन बांगलादेशी घुसखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे गावातून तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. नवलाख उंबरे येथे मागील सहा महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते. नवलाख उंबरे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता त्यांना हे तीन बांग्लादेशी इसम आढळून आले. या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बांग्लादेश मधील रहिवासी पुरावे मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हुसेन शेख, मोनिरुल गाठी, अमीरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी इसमांची नावे आहेत. या बांगलादेशी इसमाना भारतीय आधारकार्ड व पॅन कार्ड बनवून देणाऱ्या इसमाचा शोध आता पोलीस करत आहेत.

Maharashtra Live Update: गजानन कीर्तिकर यांना पत्नी शोक

शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी सौ.मेघना गजानन कीर्तिकर यांचे रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता वयाच्या ८२व्या वर्षी अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले.

Maharashtra Live Update: आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे पुण्यातून बेपत्ता

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे पुण्यातून बेपत्ता. पिंपळे निलख येथे त्यांच्या निवासस्थानातून सुमित हा 31 तारखेला सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो म्हणून गेला असून अद्यापही तो घरी परत आला नाही.

Maharashtra Live Update: लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका

लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका

जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका

तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा

अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा

अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल

सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प,बारदाना नसल्याने खरेदीला लागला 17 दिवसापासून ब्रेक

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्र ठप्प आहेत. बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्र गेली 17 दिवसापासून बंद आहे.दरम्यान जुना बारदाना वापरता येईल का याबाबत विचार सुरू आहे तर नविन टेंडर प्रक्रिया देखील करण्यात आली असुन पुढील दोन तिन दिवसात बारदाना उपलब्ध होईल अशी अपेक्षा असुन खरेदीसाठी 45 दिवस वाढवावे अशी पणन मंञ्याकडे विनंती केली असुन नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याचे सोयाबीन विकत घेतल जाव यासाठी आपला प्रयत्न असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलीय.

Nagpur : गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू

- गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा H5N1 (बर्ड फ्ल्यू)ने मृत्यू झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलाय..

- हे तिन्ही वाघ चंद्रपूरच्या सेंटर मधून उपचार घेत असताना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते...

crime News : बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटक

बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुल हा उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून एक रिव्हाल्वर आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे, हे रिव्हाल्वर ऑर्डनर्स फॅक्टरी मध्ये बनलेले आहे,बदलापूर मधील शनी नगर येथे कुख्यात गुंड अग्निशस्त्रासह फिरत असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस शिपाई पिंट्या थोरवे यांना मिळाली होती, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून पप्पू ला अटक केली.

Maharashtra Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार

नागपूरतील गोधनी रेल्वे स्थानक, वर्धात सिंदी रेल्वे स्थानक, अमरावतीतील चांदुर रेल्वे स्थानक, चंद्रपुरातील बाबुल पेठ फाटक, धुळे येथील दोंडाई शहरातील रेल्वे फाटक, जळगाव येथील स्थानिक आणि वाशिम रेल्वे स्थानकाजवळ अशा सात उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार ..

Palghar News : जव्हारमध्ये तीन दिवसांत दोन गर्भवती महिलांचा मृत्यू

पालघरच्या जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूने डोकं वर काढलं असून मागील तीन दिवसात दोन गर्भवती माता तर एक गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत . वेळेत उपचार न मिळणे हे मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर पालघरचे खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची एक बैठक पार पडली . या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते . ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसच राज्य सरकारच्या अख्यारीत असलेल्या काही उपाययोजनांसाठी आम्ही पाठपुरावा करू अस आश्वासन यावेळी खासदार हेमंत सावरा यांनी दिलं.

Nashik News : मालेगाव शहरात धुळीचे साम्राज्य,नागरीकांचे आरोग्य धोक्यात

नाशिकच्या मालेगाव शहर व परिसरात सुरु असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यांची काम संथ गतीने सुरू असल्याने मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे,यामुळे अनेक नागरीकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागले आहे,संध्याकाळच्या सुमारास नागरिकांना या धुळीतून मार्गक्रमण करावे लागत असल्याने रस्त्यांची काम तातडीने करावी अशी मागणी नागरीकां कडून होत आहे.

koyna dam earthquake : कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी बसला भूकंपाचा धक्का...

2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाची शक्यता..

धरणाचा पूर्वेकडील परीसरात जाणवला भूकंप...

कोणतीही जीवितहानी नाही..

पहाटेचा भूकंपाने 1967 साली घडलेल्या महप्रलायकरी भूकंपाचा आठवणी जाग्या .

भूकंपाने कोयना धरणाला धोका नाही.धरण सुरक्षित.

Pune News : मराठा समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार

लाल महाल येथून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार

Mumbai Crime News : घाटकोपरमधून १३ बांगलादेशींना अटक

मुंबईच्या घाटकोपर पोलिसानी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिक अटक केले आहेत. हे सर्व १३ आरोपी नालासोपारा च्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहिती च्या आधारे अटक केली होती. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख,मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख,अमीना मुराद शेख,सबिना अब्दुला शेख, कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अश्या तेरा जणाना अटक केली आहे. हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताचा सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गने भारतात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी ची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Bharat Gogawale News : महाड अपघात प्रकरणातील मृतांना पाच लाखांची मदत - मंत्री भरत गोगावले यांनी दिली माहिती

मुंबई गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यु झाला होता. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली असुन त्याला तातडीने मंजुर दिली असल्याचे गोगावले म्हणाले. रात्री उशिरा गोगावले यांनी मृतांच्या घरी जाऊन नातेवाईकांच सांत्वन केल. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या अपघातानंतर ग्रामिण भागातील रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचारा बाबत संताप व्यक्त होत असून शासकिय रुग्णालयांमधुन मिळणाऱ्या उपचारांमध्ये अमुलाग्रह बदल घडवुन अडीअडचणी दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केल आहे.

Navi Mumbai Crime News : 3 वर्षीय मुलीवर बापानेच केले लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक

घणसोली विभागात बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेय. 3 वर्षाच्या पोटच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. पीडित मुलीच्या आईला सदर बाब लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठत नराधम बापा विरोधात फिर्याद नोंदवली. रबाळे पोलीसांनी याप्रकरणी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.

pandharpur News : पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार उघड

पैसे घेऊन वशिल्याने दर्शन देणाऱ्या तोतया पुजारी चिंतामणी उत्पात याच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. विठ्ठलाचा पूजारी आहे असं सांगून पालघरच्या कुणाल घरत या भाविकांकडून विठ्ठल दर्शनासाठी 11 हजार रूपये घेतल्याचे उघड झालेय. मंदिरातील पोलिस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे पैसे घेऊन वशिल्याचे दर्शन देणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.