बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने जोरदार सलामी दिली होती. मात्र उर्वरित चार सामन्यात टीम इंडियाची वाताहत झाली. एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. नाही तर 4-1 अशी स्थिती असली असती. भारताची अशी कामगिरी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाची मॅनेजमेंट आणि खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. क्रिकेटपटूंची कामगिरी पाहता त्याने नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर टीममध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सिनिअर खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. ‘हे बघा, 23 फेब्रुवारीला (चॅम्पियन्स ट्रॉफी) पाकिस्तानला पराभूत करून तुमचं खूप सारं कौतुक होईल. सर्वच सांगतील काय कामं केलंत, पाकिस्तानला हरवलंत. तसेच आम्ही व्हाईट बॉलमध्ये चॅम्पियन आहोत.’, असं सांगत मोहम्मद कैफने टीम इंडियाचे कान टोचले. टीम इंडियाने रेड बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्याचंही सांगितलं.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘खरी गोष्ट, कटू सत्य..’ मोहम्मद कैफने अशी पोस्ट टाकून त्याने लिहिलं की, ‘जर आम्हाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची असेल तर आम्हाला टेस्ट मॅच संघ बनवावा लागेल. टर्निंग ट्रॅकवर खेळणं शिकावं लागेल. ऑस्ट्रेलियात आम्हाला सीमिंग ट्रॅक मिळणार आहे. तिथे तुम्हाला फलंदाजी करणं जमत नाही. आम्ही लोकं फक्त व्हाईट बॉलमधील राजे राहिलो आहेत. खरी गोष्ट अशी आहे की, आपल्याला खूप काम करायचं आहे. आपण खूपच पाठी आहोत.’ इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला. ‘जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची असेल तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळणं भाग आहे. टर्निंग ट्रॅकवर खेळावं लागेल. सीमिंग ट्रॅकवर प्रॅक्टिस करावी लागले. तर आपण जिंकू.’
‘3-1 ने पराभव होतो हा आपल्याला आपल्याला जागं करणारा आहे. माझ्या जे काही झालं ते चांगलं झालं. तुम्हाला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. मी फक्त गंभीरवर बोलत नाही. सर्व खेळाडूंची ही चूक आहे. सर्व प्लेयर्सला रणजी खेळण्याची संधी मिळते. ते बोलत नाहीत रणजी कोण खेळणार? पाच दिवसांचा सामना असतो आणि आम्हाला आराम हवा आहे. खेळाडू रणजी खेळत नाही आणि प्रॅक्टिसही करत नाहीत. तर तुम्ही चांगले खेळाडू कसे व्हाल. प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. खरं क्रिकेट टेस्ट क्रिकेट हे. तुम्ही सराव करणार नाही. कसोटी सामने खेळणार नाहीत तर तुम्ही कसोटी चॅम्पियनशिप जिंकू शकणार नाहीत. हे सर्व खरं आहे. जे काही झालं ते चांगलं झालं. आता काम करण्याची गरज आहे.’, असं मोहम्मद कैफने सविस्तरपणे सांगितलं.