000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर 5000 रुपयांची नोट येणार का?खरं काय खोटं काय?
Marathi January 07, 2025 05:24 AM

5000 रुपयांची नोट: देशात जेव्हा 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा 2000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र काही कालावधीतच 2000 रुपयांच्या नोटा देखील बंद करण्यात आल्या. पण, आता सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 5000 रुपयांच्या नोट जारी करणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नोटेच्या माहितीसोबतच तिचा एक फोटोही व्हायरल होत आहे.

5 हजार रुपयांची नोट खरंच चलनात येणार का?

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजवर पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआय अशी कोणतीही नोट जारी करणार नसल्याचे पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. सध्या देशात केवळ 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर आहेत. मात्र, 2023 पासूनच आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून, लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्यांनी त्या बँकेत जमा कराव्यात, असे आवाहनही केले आहे.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये युजरने लिहिले आहे, ‘5000 नवीन नोट. पाच हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. आरबीआयने ही माहिती दिली आहे की, RBI लवकरच 5000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. असा दावा सोशल मीडियावर केला आहे. मात्र, यामध्ये तथ्थ नसल्याचे बोलले जात आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.