धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानेच संपवलं बहिणीला, 200 फूट उंच डोंगरावरुन दिलं ढकलून
Marathi January 07, 2025 06:24 AM

छत्रपती संभाजीनगर क्राईम न्यूज: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीचा 200 फूट डोंगवरुन खाली ढकलून रक्त करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून देऊन संपवलं आहे. नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.
नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष अशी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आसपासचे अनेक लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रेम प्रकरणातूच ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Honor Killing Case: आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.