Leo Horoscope 2025 : 'महिलांना माहेरकडून शुभवार्ता कानावर येऊ शकेल'; सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष?
esakal January 07, 2025 07:45 AM

महिलांना माहेरकडून शुभवार्ता कानावर येऊ शकेल. लहान मुलांची काळजी घ्या. अतिश्रम टाळलेले बरे.

Leo Horoscope Singh Rashi 2025 : सिंह राशीच्या व्यक्ती मुळातच स्वतःच्या टर्म आणि कंडिशनवर पुढे जाणाऱ्या असतात. मोडेन पण वाकणार नाही, अशी काहीशी त्यांच्या स्वभावाची धाटणी असते, मात्र ती काहीशी बाजूला ठेवावी लागेल. यंदाच्या वर्षी अनेक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, मात्र त्या साधण्याचे कसब साधावे लागेल. यंदाच्या वर्षी प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रामुख्याने ताप व हाडांची दुखणी उद्भवू शकतात. विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकाल. कौटुंबिक स्वास्थ्य राखण्यासाठी पुढाकार घ्याल. तरुणाईला नोकरीच्या संधी आहेत.

जानेवारी : सिंह राशीसाठी दशमातील गुरू आर्थिक प्राप्तीसाठी चांगला आहे. प्रवास जपून करण्याची आवश्यकता आहे. त्रास होण्याचा संभव आहे. कौटुंबिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबावर व विशेषतः मुलाबाळांवर खर्च वाढू शकतो. गृहसौख्यामध्ये कमतरता जाणवेल. नोकरीत (Job) परिस्थिती सामान्य असेल. दुसऱ्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नका. व्यापार-व्यवसायामध्ये लाभाचे प्रमाण चांगले राहील. गरजेपेक्षा जास्त पैसे मिळविण्याचा अधिक मोह टाळावा, अन्यथा मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे.

(Women) शुभ असा कालावधी आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग. नोकरीसाठी संधी मिळण्याची शक्यता. कुटुंबात संघर्ष होणार नाही असे पाहा.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तंत्रज्ञानविषयक गोष्टींमध्ये रुची निर्माण होऊ शकते.

अनुकूल तारखा

१, २, ३, ८, १०, १२, २०, २१, २२, २८, ३०

फेब्रुवारी : नोकरदारांसाठी कालावधी चांगला आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. बढती अथवा आपल्याला हवे असलेले काम मिळण्याचे योग दिसतात. गुरू व मंगळाच्या कृपेने स्थावर, शेती यात उत्तम लाभ संभवतो, मात्र त्याबाबत पूर्ण खात्री करूनच व्यवहार करावेत. प्रवासात दगदग होईल. योजना आखल्याशिवाय प्रवासाला बाहेर न पडलेले बरे. कुटुंबात आजारपण येण्याची शक्यता आहे. व्यसनापासून दूर राहणे हितावह आहे. महिन्याच्या सुरुवातीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. थोरा-मोठ्यांचा आदर करा.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. मोजके बोला. वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

विद्यार्थ्यांनी अतिविचार करणे टाळावे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. एकाग्रतेसाठी उपासना उपयुक्त.

अनुकूल तारखा ः ४, ७, ८, १०, १५, १७, १८, १९, २५, २६

मार्च : या महिन्यामध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी आवर्जुन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लहान-सहान वाद उकरून काढू नका, अथवा वाढवू नका. इच्छुकांचे विवाह जुळण्यासाठी चांगले योग आहेत. व्यवसायात नवीन भागीदार शोधत असाल तर त्यासाठीही अनुकूल असा योग दिसतो. व्यवसाय चांगल्या पद्धतीने होईल. नोकरीमध्ये केलेल्या कामाबाबत सत्कार-सन्मान होण्याचे योग आहेत. विनाकारण कोणी दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोला. वादाचे प्रसंग टाळा.

महिलांनी जोडीदाराशी वाद टाळल्यास बरे. एखाद्या लहान स्वरुपाच्या व्यवसायाची सुरुवात करायला हरकत नाही. कौटुंबिक सौख्य जपा.

विद्यार्थ्यांसाठी हा महिना अपेक्षित यश न देणारा ठरू शकतो. अति आत्मविश्वास बाळगू नका.

अनुकूल तारखा ः ३, ६, ७, ९, १४, १५, १६, १७, १८, २४, २६, ३१

एप्रिल : महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली राहील, पण महिन्याच्या शेवटी खर्च वाढू शकतो. अष्टमातील ग्रहगर्दी आर्थिक आघाडीवर अस्वस्थता दर्शवते. मोठ्या लाभाच्या संधी हुकू शकतात. ताप, हाडांची दुखणी अशा आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये मध्यम आवक राहील. रोजच्या तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची नाराजी ओढवणार नाही याची काळजी घ्या. हितशत्रू डोके वर काढू शकतात. तेव्हा सावधगिरी बाळगा.

महिलांना जुने आप्त भेटू शकतात. त्यामुळे आठवणींना उजाळा मिळेल. आर्थिकविषयक निर्णय घेताना विशेष काळजी बाळगावी लागेल.

विद्यार्थ्यांचा कल चैनीच्या वस्तू विकत घेण्याकडे राहू शकतो,

पण अभ्यास व व्यायामात शिस्त आवश्यक आहे.

अनुकूल तारखा ः २, ३, ५, १२, १३, १४, २०, २२, २७, ३०

मे : गुरू आणि रवीचे भ्रमण शुभप्रद आहेत. स्त्रीधनाची प्राप्ती होण्याचा योग दिसतो. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन स्वास्थ्य लाभेल. मनात आनंदी व उत्साही विचार राहतील. कुटुंबातील एकूणच वातावरण गोडी गुलाबीचे राहील. संपूर्ण परिवारासोबत एखादी लहानशी पर्यटन यात्रा घडण्याची शक्यता आहे. नात्यांमधील बंध घट्ट करण्याची संधी. गैरसमज असतील तर ते समोरासमोर बसून दूर करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. आर्थिक अडचणींवर स्वतःच्या हिंमतीने मात कराल.

महिलांचे आरोग्य चांगले राहील. नवनवे पदार्थ करण्याची इच्छा होईल. स्थावर घेण्याचे व जुनी मालमत्ता विकण्याचे योग आहेत.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अभ्यासात मन रमेल. उच्च क्षण घेणाऱ्यांना विशेष शुभ.

अनुकूल तारखा ः

१, २, ८, ९, ११, १८, १९, २४, २५, २८, ३०

जून : देवधर्मानिमित्त यात्रेचे योग आहेत. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते. अतिव्याप झाल्यामुळे मानसिक अस्वस्थता येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे प्रकृतीसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. व्यावसायिकांसाठी अनुकूल कालावधी. व्यवसाय वृद्धी करायचे मनात असल्यास अवश्य प्रयत्न करावेत. नवीन फंडिंग वगैरे मिळू शकेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभण्याचे योग. आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी अधिक श्रम घ्यावे लागतील.

महिलांसाठी हा महिना सामान्य शुभ आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. बोलताना वाद निर्माण होणार नाहीत हे पाहावे. मुलांकडून समाधान.

विद्यार्थी वर्गासाठी थोडा कठीण काळ आहे. एकाग्रता, परिश्रम व संयम या त्रिसूत्रीने काम करावे लागेल.

अनुकूल तारखा

४, ५, ७, ८, १४, १६, २१, २३, २४, २५, २६

जुलै : शनि महाराज अष्टमात आहेत. वाहने जपून चालवा. दुसऱ्यांचे वाहन न हाताळणे हितकारक. महिन्याच्या उत्तरार्धात प्रकृती नरम राहू शकते. खबरदारी घेणे आवश्यक. सरकारी कामामध्ये अडथळे येतील, परंतु कामे पूर्ण होतील. नवीन संपत्ती घेण्यास अनुकूल काळ आहे. कौटुंबिक समस्यांवर मात करू शकाल. कुटुंबात एखाद्या शुभकार्याचे आयोजन होऊ शकेल. नोकरीत थोडी सावध भूमिका घ्यावी. उन्नती व मानसिक शांती लाभू शकेल. व्यावसायिकांच्या दृष्टीने सामान्य शुभ काळ आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

महिलांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काम वाढले तरी फायदाही संभवतो.

विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे असे दिसते. अभ्यास, इतर उपक्रम, मित्रमंडळी यात योग्य तो समतोल साधू शकाल.

अनुकूल तारखा

१, २, ३, ५, ११, १२, १३, १८, २१, २२, २४, २९, ३०, ३१

ऑगस्ट : समाजात मान-सन्मान मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मोठी संधी आहे. आर्थिक आवक चांगली होईल. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये खर्चावर ताबा ठेवा. नोकरीमध्ये पहिल्या आठवड्यात काही अडचणी भासू शकतात. हितशत्रू सतावू शकतात. सावधानता बाळगावी. आई-वडिलांशी मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांचे चांगले सहकार्य लाभण्याचे योग आहेत. धैर्य व साहस यांच्या मिलाफाने व्यवसायात चांगला नफा कमावू शकाल. लॉँग टर्म गुंतवणूक करण्यासाठी चांगला कालावधी आहे. पैसे विचारपूर्वक गुंतवा.

महिलांसाठी महिनाभर सामान्य शुभ काळ आहे. महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. नोकरीत कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.

विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासात मन लागेल. परदेशी जायची इच्छा असणाऱ्यांसाठी संधी मिळू शकते.

अनुकूल तारखा

१, ७, ८, ९, १४, १८, २०, २५, २६, २७, २८, २९

सप्टेंबर : उपवर वधू-वरांचे विवाह जमण्याचे योग दिसत आहेत. शनि, मंगळ समोरासमोर आहेत. मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळलेले हितावह आहे. आर्थिकविषयक नियोजन करावे. नवीन वाहन अथवा सोने खरेदी करण्याची इच्छा जागृत होईल. लाभात गुरू महाराज असल्याने मानसिक स्वास्थ्य लाभेल. कोणतेही कार्य सहज होणार नाही. अधिक प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे अस्वस्थता वाढेल, मात्र संयम बाळगावा. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

महिलांना धार्मिक कार्यामध्ये रुची निर्माण होईल. घरातील थोरांच्या शब्दाला मान द्यावा. विनाकारण वाद होणार नाही याची आवर्जुन काळजी घ्यावी.

विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. चांगली संगत व नियमित अभ्यासावर काम केल्यास चांगले यश मिळेल.

अनुकूल तारखा

४, ५, ६, १०, ११, १४, १६, २१, २२, २३, २४, २५

ऑक्टोबर : कौटुंबिक सौख्य मध्यम राहील. वृद्ध व्यक्तींनी आरोग्याची विशेषत्वाने काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत वातावरण चांगले राहील. पगारवाढ अथवा बढतीचे योग दिसत आहेत. मनात विनाकारण शंका येऊ शकतात. क्रोधावर नियंत्रण ठेवायला हवे. थोडक्यात मानसिक आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बोलताना काळजी घ्या. भागीदाराशी सुसंवाद ठेवा. ज्यांचा विवाह ठरताना त्रास होतो आहे अशांना आणखी वाट पाहावी लागेल. संपत्ती खरेदी - विक्रीत लाभ होण्याचे योग दिसतात. कुलदेवतेची उपासना करावी.

महिलांना माहेरकडून शुभवार्ता कानावर येऊ शकेल. लहान मुलांची काळजी घ्या. अतिश्रम टाळलेले बरे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. संधीचे सोने करावे. अभ्यासातील सातत्य तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल.

अनुकूल तारखा

१, २, ३, ८, १२, १३, १९, २१, २२, २९, ३०

नोव्हेंबर : मानसिक त्रास कमी होईल. स्थावर व्यवहारात जोखीम घ्यायचा मानस तयार होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जमून येण्याचे योग दिसत आहेत. मूल-बाळ नाही अशा दांपत्यांना संतानभाग्य लाभण्याचे देखील योग आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी नोकरीमध्ये सामान्य स्थिती राहील. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याचे मोठे योग आहेत. नवनवीन कल्पना सुचतील. त्या पूर्ण करण्यासाठी तुमची धडपड असेल, मात्र कष्ट करावे लागतील.

महिलांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी महागडी वस्तू घेण्याचे स्वप्न साकार होण्याचे योग.

विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल काळ. सकारात्मक विचार लाभदायक. हवे तेथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकेल.

अनुकूल तारखा

४, ७, ८, १५, १६, १७, २८, २४, २५, २६, २७

डिसेंबर : मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. अष्टमात शनि महाराज आहेत, पण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा. घर, शेतीमधील अडखळलेली कार्ये मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवीन मित्र लाभतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाणे घडेल. आरोग्य चांगले राहील, तरी पथ्यपाणी सांभाळलेले बरे. कुटुंबात मंगलकार्य घडण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीत यश शक्य आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी व सहकाऱ्यांची साथ लाभेल. व्यवसायात मनातील कल्पना सत्यात उतरू शकतात. भागीदाराशी जुळवून घेणेच योग्य.

महिलांच्या इच्छापूर्तीचा काळ आहे. विशेषतः मुलांच्या कामगिरीने आनंदी व्हाल. असे जरी असले तरी अनावश्यक वाद होणार नाहीत हे पाहा.

विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांचे मन अध्ययनात रमू शकेल. अनावश्यक वेळ वाया घालवू नये.

अनुकूल तारखा

२, ३, ५, ७, १३, १४, १५, १६, २२, २३, २९

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.