राज्यात एकीकडे थंडीचा कडका वाढत असताना अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गारठ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. राज्यातील मराठावाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात पावसाचं वातावरण तयार झालंय.