नवीन वर्षाची सुरुवात होऊन आज सात दिवस झाले आहे. नवीन वर्ष अनेकांसाठी खूप खास ठरले. यात मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. नवीन वर्षाच्या सात दिवसातच काही कलाकार लग्नबंधनात अडकले तर काहींनी आपल्या नात्याचा खुलासा केला. अनेकांनी नवीन घर घेतले तर काहींच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.
आनंदाच्या वातावरणात आता मराठी अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री बापटने (Priya Bapat ) गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या घरी एका सदस्याचे आगमन झाले आहे. उमेशने सोशल मीडियावर पोस्ट करूनही आनंदाची बातमी चाहत्यांन दिली आहे. उमेशने नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करून नवीन बाईकचे आगमन केले आहे. नवीन वर्षात उमेश कामतने नवी कोरी खरेदी केली आहे.
बाईक खरेदी करताना गेल्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "पहिला मिनी व्लॉग हा असावा....माझे पहिले प्रेम आयुष्यात परत आले आहे... भाई (संकेत अविनाश कोर्लेकर) लव्ह यू... आणि अर्थातच बायको आजची व्हिडिओग्राफर प्रिया बापट..." त्याच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
उमेश कामत आणि प्रिया बापट प्रेक्षकांचे लाडके जोडपे आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक, वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. या दोघांची 'आणि काय हवं?' ही वेब सिरीज खूप गाजली होती. यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कायम एकमेकांना प्रोत्साहन करताना हे जोडपे पाहायला मिळते. आता नवीन बाईकने उमेश-प्रिया फिरायला जाणार हे आपल्याला लवकरच कळेल.