तुमचं महत्त्व जाणून घ्या…मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानच्या पोस्टने वेधलं लक्ष
Marathi January 08, 2025 09:24 PM

अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती.मात्र अचानक या मालिकेतून तेजज्ञीने एक्झिट घेतली आणि चर्चांना उधाण आले.चाहत्यांना तिने ही मालिका अचानक का सोडली हा प्रश्न पडला असतानाच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले. त्यानंतर त्या पोस्टमधील एका फोटोओळीने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

तेजश्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, साडीमधील सुंदर फोटो पोस्ट करत तेजश्रीच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही.’ मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

तेजश्रीची ही पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून बऱ्याच वर्षानंतर टीव्हिवर कमबॅक केले होते. ही मालिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उरत होती. मात्र अचानक या मालिकेला तेजश्रीने रामराम केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.