संतोष देशमुख खून प्रकरण : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणातील याचिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती. तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा, असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे.
अशातच, धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक कॉल व्हायरल झाला आहे. या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा. अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही त्यांनी या याचिकेत केली होती. मात्र आज याचिका मागे घेण्यात आल्याचे या कथित व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे पुढे आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असताना मागच्या आठवड्यात एक याचिका ऍड.सोळंके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. या याचिकेमध्ये वाल्मिक कराड यांना आरोपी बनवण्यात यावं. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि अशा अनेक बाबींचा समावेश या याचिकेत केला होता. तर याचिकाकर्ते म्हणून यात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच नाव होते. मात्र आज अखेर ही याचिका मागे घेण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारची याचिका मला न विचारता दाखल करण्यात आल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे धनंजय देशमुख या याचिके संदर्भात ऍडव्होकेट सोळंके यांच्याशी बोलताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वकील शोमित साळुंखे आमच्याकडे आले आणि आपली ओळख दिलीय. आपण या संदर्भातील चौकशीसाठी याचिका दाखल करु, अस सांगीतलं. मात्र आम्ही त्या वकिलाला सांगीतल तपास सुरु आहे, त्यामुळे तुम्ही असं काही करु नका. मात्र या वकिलाने परस्पर पीटीशन दाखल केली. आम्हाला काहीच कळवलं नाही. आम्ही सीआयडी ऑफिसला गेल्यावर ही माहिती कळाली. सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत ही याचिका मागे घेतली. वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित धनंजय देशमुख यांनी वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. त्यावर धनंजय देशमुख यांची देखील सही होती परंतु त्यावरील मजकूर धनंजय देशमुख यांना न विचारता वापरण्यात आला होता का अशी शंका येत आहे. माझी सही तुम्ही कशी वापरली? यातील मजकूर मला माहित नाही. असही धनंजय देशमुख वकिलाशी बोलताना म्हणाले आहेत.
1. मयत सरपंच यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाल्यानंतर देखील आजपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा.
2. या घटनेचा मास्टरमाइंड ज्याचे नाव पुरवणी जवाबामध्ये दिलेले आहे. ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टरमाईंड म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावले उचलून वाल्मिक कराडवर Mocca कायदा, हत्येचा कलमानुसार एफ.आय.आर. तात्काळ दाखल करावी व पुढील तपास करावा.
3. बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारी राजकीय रसद, मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा, त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये. मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचे भूतकाळातील निकटवर्तीपणा, सहचर्य व लागेबांधे यांचा सखोल तपास करून याप्रकरणी तपास यंत्रणेने योग्य तो अहवाल सादर करावा.
4. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही, याबद्दल पावले उचलत राज्य शासनाला, त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तूर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून कायम दूर ठेवण्याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाने पारित करावा, असा मागण्या करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
अधिक पाहा..