भारत आणि पाकिस्तानातील हाडवैर साऱ्या जगाला माहिती आहे. साल १९४७ फाळणीनंतर दोन्ही देशातील दुश्मनीत फरक पडलेला नाही. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानात चार युद्ध झालेली आहेत. सर्व युद्धात पाकिस्तानला धुळ चाटावी लागली आहे. साल १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करुन पूर्व पाकिस्तानचा लचका तोडून बांग्लादेश निर्मिती झाली आहे.बांगलादेश आणि भारताचे नाते अनेक वर्षे चांगले आहे. परंतू बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना परागंदा व्हावे लागल्यानंतर त्यांना भारतात आश्रय दिल्याने दोन्ही देशाचे संबंध बिघडले आहेत. आता दोन्ही देशात तणाव आहे. या स्थितीत या तिन्ही देशाचे सैनिकी बलाबल काय आहे हे पाहूयात…
ग्लोबल फायर पॉवर मिलिट्री रँकींगमध्ये १४५ देशांना सामील केले आहे. या ताकदवान देशात बांग्लादेशाचे लष्कर ३७ व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे. भारताचा विचार केला तर भारत चौथ्या स्थानावर आहे.
शस्रास्रांचा विचार केला तर बांग्लादेशाजवळ १३,१०० चिलखती वाहने, ३२० रणगाडे, ३० सेल्फ प्रोपेल्ड ७० रॉकेट आर्टीलरी आहेत.पाकिस्तान जवळ ५० हजाराहून अधिक चिलखती वाहने, ६०२ रॉकेट लॉन्चर आहेत तर भारताजवळ ४,६१४ रणगाडे, १,५१,२४८ चिलखती वाहने आणि १४० सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी आहेत.
वायूसेनेचा विचार केला तर भारताकडे २,२९६ विमाने आहेत. यातील ६०६ लढावू फायटर जेट आहेत. तर बांग्लादेशाच्या वायूसेनेजवळ एकूण २१६ विमाने आहेत. यात केवळ ४४ जेट फायटर विमाने आहेत. पाकिस्तान वायू सेनेकडे एकूण १४३४ विमाने आहेत.
बांगलादेशात लष्करात सुमारे २,०४,००० सक्रीय लष्कर अधिकारी आहे. पाकिस्तानच्या सैन्याची कुमक ६,५४,००० इतकी आहेत. तर भारतीय सैन्यात सुमारे १४,५५,५५० लष्करी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या भारताकडे आहेत.