Sony-Honda च्या पहिल्या इलेक्ट्रीक कारची प्री-बुकींग सुरु, Afeela 1 ची काय आहेत वैशिष्ट्ये
GH News January 08, 2025 08:12 PM

सोनी-होंडा कंपनीची पहिली इलेक्ट्रीक कार Afeela 1 हीची बाजारात एण्ट्री होणार आहे. या इलेक्ट्रीक कारची प्री-बुकींग देखील सुरु झाली आहे. या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर्स मार्केटमध्ये असलेल्या अन्य इलेक्ट्रीक कारहून भिन्न आहेत. अफीला कार मॉर्डन टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. या इलेक्ट्रीक कारमध्ये एडव्हान्स फिचर्स देखील दिलेले आहेत. चला तर या गाडीचे प्रत्येक फिचर्स, डिझाईन आणि स्पेसिफिकेशनवर नजर टाकूयात…

अफीला 1 दोन ट्रीम्स ऑप्शनमध्ये मिळणार आहे. याची सुरुवातीची किंमत 89,900 डॉलर ( सुमारे 77 लाख रुपये ) असणार आहे. या कारसाठी ऑनलाईन रिझर्व्हेशन अफीला वेबसाईटवरुन करता येणार आहे. या कारला 17,100 रुपये टोकन अमाऊंट देऊन बुक करु शकता. ही रिफंडेबल अमाऊंट आहे. जेव्हा ही कार तुम्हाला मिळेल तेव्हा ही रक्कम बिलात जोडली जाईल. या कारची विक्री कॅलिफोर्निया येथून या वर्षी सुरु होऊ शकते. या कारची डीलिव्हरी साल 2026 च्या मध्यावर सुरु होणार आहे.

अफीला 1 मध्ये चाळीसहून अधिक सेंसर लावलेले आहे.  एडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम ( ADAS ) देण्यात आलेले आहे. ही कार कोणत्याही अडचणी शिवाय सेफ ड्रायव्हींगचा अनुभव देते. या कारमध्ये Qualcomm Technologies च्या Snapdragon डिजिटल चेसिसचा वापर केला आहे. यामुळे ही कार अधिकच स्मार्ट झाली आहे. Afeela 1 मध्ये इंटरॅक्टीव्ह पर्सनलाईज्ड एजंट दिला आहे. यात नैर्सगिक रित्या व्हॉईस इंटरॅक्शन अलाऊ करते. यातून चालक कारचे अनेक फिचर्स नियंत्रित करणे आणि एक्टीव्हीटी सजेशन मिळविण्यास मदत मिळते.

फिचर्स काय आहेत ?

या कारमध्ये प्रत्येक आसनाला ऑप्टीमाईज्ड साऊंड सिस्टम आणि डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वेगवेगळे एप्स आणि कंटेटचा अनुभव घेता येतो. या कार इमर्सिव्ह साऊंड, हाय क्लॉलिटी ऑडीओ एक्सपीरिएन्ससाठी sony चा 360 स्पॅशियल साऊंड टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये टेस्ला आणि रिवियनशी टक्कर

अफीला 1 EV एकदा फुल चार्ज केल्यानंतर 482 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते असे सोनी होंडा मोबिलिटीने म्हटले आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये ती टेस्ला आणि रिव्हीयन टक्कर देणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.