नवी मुंबई : सिडकोने दोन महिन्यांपुर्वी नवी मुंबईतील विविध भागात असलेल्या घरांची लॅाटरी जाहीर करताना घरांच्या किंमतीचा उल्लेख केलेला नव्हता. वाशी , खारघर , तळोजा , भागातील गृहप्रकल्पातील घरे घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडल्या होत्या. मात्र या घरांच्या किंमती करोडच्या घरात असल्याने अर्ज भरणार्यांच्या डोळ्यात सिडकोने धुळफेक केल्याचा आरोप लोकांनी केलाय. वाशीतील घरांच्या किंमती थेट 75 ते 80 लाखांच्या घरात आहेत. तर खारघर मधील घर 1 कोटीच्या वर जाणार आहे. खासगी बिल्डरांप्रमाणे सिडको घरांच्या किंमती लावत आहेत. आधीच घरांच्या किंमती जाहीर करून लॅाटरी काढली असती तर ज्यांची पात्रता नाही त्यांनी अर्ज भरलेच नसते. सव्वालाखांच्या वर लोकांनी घरांसाठी अर्ज भरल्याने सिडकोकडे मोठी रक्कम जमा झाली.दुसरीकडे आयटी रिटर्न , उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल आदी कागदपत्रांसाठी 5 हजारांच्या वर खर्च आल्याने हा फुकट गेलाय, असा आरोप देखील अर्जदारांनी केला.
सिडकोमध्ये वाशीसाठी विचार केला होता. 40 ते 50 लाखांचं बजेट अपेक्षित होता, तो 73 ते 75 लाखांपर्यंत दर जाहीर केला आहे. सामान्य माणसांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. खारघरमध्ये दर 48 ते 50 लाखांपर्यंत गेला आहे. तो 30 ते 35 लाखांपर्यंत असायला हवा होता. फॉर्म भरुन चुकीचं झालं आहे. अर्ज भरायला मुदतवाढ दिली गेली. सिडकोनं अगोदर दर जाहीर करायला हवे होते. 236 रुपयांप्रमाणं सव्वा लाख अर्जांची किती किमत होते. अर्ज दाखल करण्याची मुदत वारंवार वाढवण्यात आली. सिडकोनं अर्जदारांची फसवणूक केली आहे. सामान्य लोकांना परवडणारी घरं नाहीत.सिडकोनं 236 रुपये देखील परत द्यावेत.कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागला. सिडको सुरुवातीला अर्ध्या दरात किंवा परवडणाऱ्या किंमतीत घर देईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, 73 लाखांचं घर 78 लाखांवर जाऊ शकतं, लोकांना ते परवडणार नाही, असं अर्जदार प्रदीप पाटील म्हणाले.
सिडको अर्जदार, सिडकोनं अगोदर किमती जाहीर करायला हव्या होत्या. लोकांनी त्यांच्या उत्पन्नानुसार इथं परवडत असेल तर अर्ज केला असता. इतका दर द्यायचा असेल तर सिडको ऐवजी दुसरा विचार केला होता. सिडकोकडून वारंवार वाढवण्यात आलेल्या तारखांवरुन देखील नाराजी व्यक्त केली. कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी देखील अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सिडकोनं दर कमी करावेत, अशी अपेक्षा देखील अर्जदार अनिकेत पाटील यांनी व्यक्त केली.
मी वाशीला घर घेणार होतो, तिथं दर 70 लाखांच्या वर गेला आहे. तो दर किमान 50 लाखांच्या दरम्यान असायला हवा होता. इतका दर असेल तर परवडणार नाही. एखादा व्यक्ती 50 हजार रुपये दरमहा कमवत असेल तर सगळे पैसे त्यामध्येच जाऊ शकतात. घरखर्चासाठी देखील पैसे राहणार नाहीत. या किमतीत बाहेर चांगलं घर, चांगलं ठिकाण भेटेल. फसवणूक झालीय, पैसे परत करा किंवा किमती कमी करा, असं अर्जदार शुभम पाटील म्हणाले.
सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. सिडकोनं लॉटरी काढलेली त्यात लोकेशन आहेत. काही प्राईम आहेत, स्टेशन जवळील काही आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत. काही ठिकाणी किंमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, असं संजय शिरसाट म्हणाले. आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही, यासंदर्भात वाटलं तर फेरविचार करु, असंही त्यांनी म्हटलं. बिल्डर हा एरीया बिल्टअप एरिया देतो आम्ही कार्पेट एरिया देतो, संजय शिरसाट म्हणाले.
इतर बातम्या :
अधिक पाहा..