मुंबई : लोकसभेला 80 टक्के ‘परफॉमन्स’ दाखविलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेला फक्त 10 जागा निवडून आणता आल्या. अजितदादा पवार यांना घवघवीत यश मिळालं. अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा निवडून आणल्या. महायुती सत्तेत आली आणि महाविकास आघाडीला सपाटून मार खावावा लागला.
त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार, खासदार आणि नेत्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. यावरून ‘तिकडे’ जाणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांगलंच सुनावलं आहे.
– Advertisement –
हेही वाचा : अजितदादांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट, एक तासाच्या चर्चेत काय झालं?
कोणाला ‘तिकडे’ जायचे असेल, तर त्यांनी जरूर जावे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीस बुधवारी प्रारंभ झाला. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
– Advertisement –
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत 56 वरून 10 वर आला आहे. यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे. बैठकीत पहिल्यात रांगेत बसलेले अनेकजण ‘तिकडे’ हारगुच्छ देऊन आले आहेत. कोणाला ‘तिकडे’ जायचे असेल त्यांनी जरूर जावे,” अशा शब्दांत जयंत पाटील कान टोचले आहेत.
निवडणुकीत गाफील राहिलो…
विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. “लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा निवडणुकात ‘हातचा मळ’ असल्याचा आम्ही समज केला. दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्यानं नोंद घेतली होती. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती. ते घरोघरी गेले. हिंदुत्त्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या. मतदारासांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रूपात मिळाला,” असं म्हणत शरद पवारांनी संघाचं कौतुक केले आहे.
हेही वाचा : “मिटकरींना ‘NCP’तील बडी मुन्नी बोलायला लावतेय, मुन्नीची मी सुन्नी करतो,” ‘त्या’ आरोपानंतर धस भडकले