Silo Collapsed : कारखान्याची चिमणी कोसळली, 9 जणांचा मृत्यू; 25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली
Marathi January 09, 2025 11:25 PM

छत्तीसगड सायलो कोसळला : छत्तीसगडमधील मुंगेली येथे मोठी दुर्घटना (Chhattisgarh Silo Collapsed) घडल्याची माहिती समोर आली आहे. स्मेल्टिंग प्लांटची चिमणी कोसळल्याने 25 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 कामगारांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनन व्यवस्थेने बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

अधिकची माहिती अशी की, कारखान्याची चिमणी कोसळल्याने (Chhattisgarh Silo Collapsed)  25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.. दरम्यान यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे. लोखंड बनवण्याच्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने हा अपघात झालाय.  मुंगेलीचे जिल्हाधिकारी राहुल देव याबाबत बोलताना म्हणाले, मुंगेली जिल्ह्यातील सरगाव येथील लोखंड बनवणाऱ्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने कामगार अडकण्याची शक्यता आहे. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

मुंगेलीचे एसपी भोजराम पटेल पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला माहिती मिळाली होती की स्मेल्टिंग प्लांटमधील चिमणी आणि सायलोचा काही भाग कोसळला आहे आणि काही कामगार त्याखाली अडकले आहेत. जवळपास सर्वच विभागांचे कर्मचारी येथे आहेत. येथे 3-4 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. ढिगारा काढून टाकल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. दोन जखमींना उपचारासाठी बिलासपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मदत कार्य चालू आहे. घटनास्थळी तातडीने  पोलीस आणि रेस्क्यू टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही दुर्घटना सरगाव येथील रामबोड या भागात घडली आहे. प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. ही दुर्घटना लोखंडी पाईप बनवण्याच्या कारखान्याचे बांधकाम सुरू असताना घडलीये.

इतर महत्त्वाच्या बातम्या

AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.