घटनास्थळी पोलीस प्रशासन (Miraj Police) दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Temple Gold Theft : आरग (ता. मिरज) येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात (Padmavati Mata Temple) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाभाऱ्यातील १८ तोळे सोने (Gold Jewelry) चोरट्यांनी लंपास केले आहे. मंदिराचे उपाध्ये पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने आरगसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी प्रशासन (Miraj Police) दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला.
गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवनींच्या साह्याने उचकटण्यात आली. गाभाऱ्यात प्रवेश करून सुमारे 18 तोळे सोने लंपास केले. मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता, मंदिराचे कडी तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला.
त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला. येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. सकाळी श्वान पथकासह, एलसीबी, फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.