पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे उद्धघाटन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी भारतात परत आले होते. यानिमित्ताने या दिवसाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक देशाचे नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Kolhapur Guardian Minister post Live News : कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेचकोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी 3 दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि कोथरूडचे आमदार तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे तिन्ही नेते कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता महायुतीतील वरिष्ठ नेते नेमकं कोणाला कोल्हापूरचं पालकत्व देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sujay Vikhe will meet Amit Shah : सुजय विखे पाटील घेणार अमित शाह यांची भेटभाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी आज ही भेट होणार आहे. नुकतंच सुजय विखे यांनी शिर्डीत येणाऱ्या भिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अशातच आता ते शहांची भेट घेणार आहेत. तर 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Santosh Deshmukh Murder Case Live News : सीआयडीकडून वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्तसीआयडीकडून वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या 3 मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे मोबाईल जप्त केले असले तरी अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराडने खंडणीसाठी फोनवर बोलल्याचे स्पष्ट होणार नाही? अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Tirupati Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीआंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे.