अदानी समूह आणि एसआरएची दादागिरी शिवसेनेने मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला अखेर ब्रेक
Marathi January 09, 2025 10:25 PM

आज वांद्रे पूर्व येथील भारतनगर रहिवाशांना कुठलीही नोटीस न देता घरांवर हातोडा उगारणाऱ्या एसआरए अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी उग्र आंदोलन केलं.

यातच आंदोलक नागरीकांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली.

कोर्टाचे आदेश झुगारून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करून नागरीकांसोबत ठाम उभे राहण्याचा विश्वास त्यांनी येथील रहिवाशांना दिला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली. हेच चित्र आज आपण मुंबईकर आणि मराठी माणूस म्हणून रोखलं नाही तर, अदानी प्रत्येकाच्या घरावर बुलडोझर घेऊन येईल.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.