तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी बुधवारी (ता.8) झालेल्या भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी पूर्ण ताकदीनं काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांना धक्का देण्याच्या मानसिकतेत असल्याचं बोललं जात आहे.
Santosh Deshmukh Murder Case : जालन्यात आज जनआक्रोश मोर्चामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. काल पैठणमध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता. तसाच मोर्चा आज जालन्यात काढला जाणार आहे.