ब्रोकरेजने फर्म मिराई अॅसेट शेअरखानने 5 शेअर्सवर दिला खरेदीचा सल्ला; गुंतवणूकदारांना मजबूत कमाईची संधी
ET Marathi January 10, 2025 07:45 PM
मुंबई : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी दबाव दिसून येत आहे. निफ्टीसाठी २३५०० ची पातळी ही सपोर्ट रेंज आहे. ही रेंज ब्रेक झाल्यास आणखी घसरण होऊ शकते. जर तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमकुवत राहिले तर येणाऱ्या काळात मोठी घसरण दिसून येऊ शकते. २०२५ हे वर्ष बाजारासाठी एकत्रीकरणाचे वर्ष असेल ज्यामध्ये कमी पातळीवर दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी असेल. मिराई अॅसेट शेअरखानने पुढील १२ महिन्यांसाठी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ४२% पर्यंत वाढीचे लक्ष्य असलेले ५ शेअर्स निवडले आहेत. या यादीत ओबेरॉय रिअॅल्टी, वरुण बेव्हरेजेस, गोदरेज कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक आणि आरके फोर्जिंग्ज यांचा समावेश आहे. आरके फोर्जिंग्जRK Forgings चा शेअर ९०४ रुपयांवर आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य ११११ रुपये असून, जे सध्याच्या किंमतीपेत्रा २३ टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०६४ रुपये आणि नीचांक ६०१ रुपये आहे. आयसीआयसीआय बँकICICI BANK चा शेअर १२६२ रुपयांवर आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य १५५० रुपये असून जे सध्याच्या किंमतीपेक्षा ३० टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३६१ रुपये आणि नीचांक ९७० रुपये आहे. गोदरेज कंझ्युमरGodrej Consumer शेअर ११८१ रुपये आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य १६७५ रुपये असून जे सध्याच्या किंमतीपेक्षा ४२ टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १५४१ रुपये आणि नीचांक १०५५ रुपये आहे. वरुण बेव्हरेजेसVarun Beverages चा शेअर ६०५ रुपयांना आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य ७५० रुपये असून ते सध्याच्या किंमतीच्या २४ टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६८२ रुपये आणि नीचांक ४७८ रुपये आहे. ओबेरॉय रिअॅलिटीOBEROI REALTY चा शेअर २२४६ रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य २६९४ रुपये असून ते सध्याच्या किंमतीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २३५० रुपये आहे आणि नीचांक १२६८ रुपये आहे.
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)