37475
क्रीडा स्पर्धेत साळिस्ते शाळेचा ठसा
तालुकास्तर स्पर्धा ः विज्ञान प्रदर्शनातही चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० ः कणकवली तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा नडगिवे येथे झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक साळिस्ते नं. १ या शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारांत मुलांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या क्रीडा महोत्सवात १०० मीटर धावणे मोठा गट (मुलगे)-सुरज गुरव (सातवी) याने द्वितीय, लांब उडी लहान गट (मुली)-दुर्वा गुरव हिने तृतीय, कबड्डी लहान गट (मुली) स्पर्धेत शाळेचा संघ विजेता ठरला. ज्ञानी मी होणारमध्ये (मोठा गट) शाळेचा संघ उपविजेता ठरला. त्यामध्ये स्वरा चिके व सेजल ताम्हणकर यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील उत्तम यशामुळे तळेरे प्रभागाला कणकवली तालुका क्रीडा स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप मिळाली. यामध्ये साळिस्ते क्र. १ या शाळेचा सिंहाचा वाटा आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही शाळेने चमकदार कामगिरी केली. शाळेचे पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांनी शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, सीताराम पारधिये, पदवीधर शिक्षिका संजना ठाकूर, उपशिक्षक संगीता वळवी, उपशिक्षक माधवी बुचडे यांचे लाभले. या स्पर्धेच्या यशाचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य ताम्हणकर, साळिस्ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, उपाध्यक्ष गजानन रामाणे, शिक्षणप्रेमी संतोष पाष्टे, व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत बारस्कर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष सचिन ताम्हणकर, शिक्षण प्रेमी चंदूशेठ हरयाण, व्यवस्थापन सदस्य सान्वी ताम्हणकर, व्यवस्थापन सदस्य रिया चिके, अंगणवाडी सेविका दीपाली गुरव, अंगणवाडी सेविका स्वाती ताम्हणकर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.