UPSC Interview 2024: दिल्लीच्या निवडणुकांमुळं UPSCच्या मुलाखतीची तारीख बदलली; जाणून घ्या नवी तारीख
esakal January 11, 2025 03:45 AM

UPSC Interview 2024 Marathi News : जर तुम्ही युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०२४च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुलाखतीपर्यंत पोहोचला असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण युपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कारण नियोजित मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यानच दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळं मुलाखतीच्या नव्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात युपीएससीनं काढलेल्या अधिकृत नोटीस म्हटलं की, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. नेमकं याच दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी युपीएससीची मुलाखत पार पडणार होती. पण या दिवशी उमेदवारांची गैरसोय होऊ नये, तसंच दिल्लीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी या दिवशी होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होणारी मुलाखत आता ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडेल.

ज्या उमेदवारांनी यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२४ उत्तीर्ण केली आहे. अशा उमेदवारांचा अंतिम मुलाखतीचा कार्यक्रम दिल्लीत ७ जानेवारी २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या काळात पार पडणार आहे. यासाठी एकूण २८४५ उमेदवार मुलाखत देणार आहेत. मुलाखती दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

सकाळच्या सत्राची वेळ सकाळी ९ वाजता. तर दुपारच्या सत्राची वेळ १ वाजता आहे. जर कोणी उमेदवार सेकंड क्लास आणि स्लीपर कोचनं प्रवास करणार असेल तर त्याला प्रवास खर्च देखील रेल्वेकडून देण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.