Amisha Patel : ती एक घटना अन् ४ तास बेशुद्ध पडली; अमिषाने 'गदर २' चित्रपटाची भयानक आठवण सांगितली
Saam TV January 10, 2025 11:45 PM

Amisha Patel : गदर २ हा २०२३ मधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली. चित्रपटातील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिषाने चित्रपटातील एका दृश्यादरम्यान तिची प्रकृती इतकी बिघडली की ती ३-४ तास उठली नसल्याचा अनुभव सांगितला आहे. ती मेली आहे की काय असा प्रश्न या सिनमुळे सगळ्यांना पडला होता. एवढेच नाही तर सनी देओल पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यातील तारा सिंह बनून तिला मदत केली असल्याचे सांगितले.

अमिषाला काय झाले होते?

एका मुलाखतीत अमिषा म्हणाली, 'मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले होते. मी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्माजींना सांगितले होते की मी थंडीमुळे आजारी पडेन, कृपया माझ्यासाठी पाणी गरम ठेवा. ते म्हणाले, हो पाणी गरम असेल, काळजी करू नकोस. पण जेव्हा मी शूटसाठी गेले तेव्हा मी फक्त पातळ सुती सलवार कमीज घातला होता. हीच समस्या आहे की नायिकांना नायकांसारखे जॅकेट दिले जात नाहीत. हिरो तर कुर्ता-पायजम्याखाली वॉर्मर्स घालतात. पण आम्ही तस करू शकत नाही. पहिल्यांदा जेव्हा माझ्या अंगावर पाणी पडले तेव्हा मला धक्काच बसला कारण ते खूप थंड होते.

अमिषा बेशुद्ध पडली होती

म्हणाली, 'सिन शूट केल्यानंतर, मला उचलून मेकअप रूममध्ये नेले.' मी बेशुद्ध पडले होते. मी ३-४ तास उठलेच नाही. लोकांना वाटले की मी मेले आहे. मी परिस्थितीत होतो की लोक म्हणू लागले की मी जगू शकणार नाही. त्यांनी मला लोकरीच्या ब्लँकेटने झाकले. जेव्हा मला ४ तासांनी जागा आली आणि डोळे उघडले तेव्हा मी विचारले की मी कुठे आहे. या ४ तासांत काय घडले याबद्दल मला काहीच माहिती नव्हते.

सनी देओलने काय केले?

अशा वेळी ने तिची काळजी घेतल्याचे अमिषाने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, 'सनी सर माझ्या आयुष्यातील खरे तारा सिंह आहेत. सकीनला जेव्हा जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते नेहमीच तिच्यासाठी असायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ते त्यांच्या खोलीतून एक रक्तदाब मशीन घेऊन आले आणि माझा रक्तदाब तपासला. माझे बॉडी टेंपरेचर तपासले. मुंबईत आमचा एक सामान्य डॉक्टर आहे म्हणून सनी सरांनी त्यांना फोन करत सल्ला घेतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.