मोठ्या संख्येने लोक दररोज भारतीय रेल्वे सेवेचा वापर करतात. लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. यामुळे कमी दरात, काही तासात आपण आपलं ठिकाण गाठू शकतो. हजारो किलोमीटरचे प्रवास अगदी काही तासात पूर्ण होते. ट्रेनमध्ये सामान्य डब्यापासून ते एसी क्लासपर्यंतच्या सुविधा आहेत. ज्यामध्ये खानपान व्यवस्था, टॉयलेट सुविधा आणि एसी इत्यादींचा समावेश आहे. ट्रेनचा प्रवास करण्यापूर्वी आपण तिकीट काढतो. पण ट्रेनचे तिकीट न काढता, विनातिकीट प्रवास केला तर?
पूर्वी ट्रेनचे टिकीट काढण्यासाठी आपल्याला रांगा लावाव्या लागायच्या. परंतु आता काही मिनिटात ऑनलाइनद्वारेही आपण तिकीट काढू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही सुविधांद्वारे आपण काढू शकतो. पण जर तुम्ही विना ट्रेन तिकीट प्रवास करताना पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. विना तिकीट प्रवास केल्याने तुमच्यावर किती दंड आकारला जाऊ शकतो? जाणून घ्या.
तिकीटाशिवाय प्रवास केल्यास काय होईल?
करायचा असेल तर विना तिकीट प्रवास टाळा. शक्यतो प्रवास करण्याआधी टिकीट जरूर काढा. जर विना तिकीट प्रवास केलात तर, तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती विना तिकीट प्रवास करताना पकडली गेली तर त्या व्यक्तीला २५० रुपये दंड आकारला जातो.
तर दुसरीकडे, ट्रेन जिथून सुरू झाली आणि जिथे तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या ठिकाणपर्यंत संपूर्ण भाडे तुमच्याकडून आकारले जाते. तुम्हाला अचानक कुठेतरी जावे लागले तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि नंतर लगेच टीटीईला भेटून दंड न भरता तुमचे तिकीट बनवून घेऊ शकता. त्याच वेळी, जर ट्रेनमध्ये जागा रिक्त असेल तर तुम्ही ती सीट टीटीईकडून मागू शकता.
टीटीईने जास्त पैसे मागितल्यास तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता. टीटीईने तुमच्याकडून दंड वसूल करताना किंवा तिकीट देताना रकमेपेक्षा जास्त रक्कम मागितली, तर तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुक करू शकता. किंवा तुम्ही रेल्वे तिकीट ऑफलाइन देखील बुक करू शकता, ज्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील ट्रेनच्या तिकीट काउंटरवर जावे लागेल.