2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती?
Marathi January 10, 2025 05:24 PM

सोन्याचा भाव: सध्या सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. दरम्यान, चालू 2025 वर्षात तरी सोन्याचे दर कमी होणार की आणखी त्यामध्ये वाढ होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2025 मध्ये सोन्याच्या दराची नेमकी काय परिस्थिती राहणार याबाबतची माहिती पाहुयात.

2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत झपाट्यानं वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सोन्याचील दरवाढीचा मोठा फायदा गुंतवणुकदारांना झाला होता. मात्र, ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, 2025 मध्ये देखील अशीच सोन्याच्या दरात वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. युरोप आणि मध्यपूर्वेतील तणावाबरोबरच जागतिक चलनवाढीमुळं 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  सोन्याच्या किंमतीवर अनेक कारणांचा परिणाम होतो. त्यापैकी जागतिक अर्थव्यवस्था, चलनवाढ, राजकीय कारणे, मागणी पुरवठ्यातील तफावत ही प्रमुख कारणे आहेत.

भारतात सण आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ

2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते, कारण, भारतात सण आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. मागणी वाढेल, त्यामुळं किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, जगातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. सध्या देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

2025 मध्ये सोन्याच्या किमतींवर परिणाम करणारे घटक कोणते?

जागतिक आर्थिक स्थिती

सोन्याच्या किंमतीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो. अमेरिका आणि युरोपमधील चलनवाढ आणि बँकांच्या धोरणांचा यावर परिणाम होईल. अमेरिकन बँकांनी 2025 मध्ये व्याजदर वाढवण्याबाबत बोलले आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमती किंचित खाली येऊ शकतात. पण जर महागाई जास्त राहिली तर लोक सुरक्षित गुंतवणूक मानून अधिक सोने खरेदी करतील आणि त्यामुळे किंमती वाढू शकतात.

राजकीय तणावाचा परिणाम

जगातील मोठ्या देशांमधील संघर्ष किंवा तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. जर परिस्थिती बिघडली तर लोक सुरक्षिततेसाठी सोन्यात पैसे गुंतवू लागतील, ज्यामुळे मागणी वाढेल आणि किंमती वाढतील.

भारतातील सोन्याची मागणी

भारतात दिवाळी, अक्षय्य तृतीया आणि लग्नसोहळ्यांसारख्या सणांमध्ये सोन्याची मागणी वाढते. 2025 मध्ये भारतात सोन्याची खरेदी पुन्हा वाढेल अशी अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढते तेव्हा किमतीही वाढतात.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर सोन्याच्या दरात वाढ होणार

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. रुपया मजबूत झाला तर सोने स्वस्त होईल. पण जर रुपया कमजोर झाला तर सोन्याची किंमत वाढते, कारण भारत सोने बाहेरून आयात करतो.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.