Latest Marathi News Updates : पुढच्या २३ जानेवारीआधी बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल - उद्धव ठाकरे
esakal January 10, 2025 09:45 PM
Mumbai Live: पुढच्या २३ जानेवारीआधी बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल - उद्धव ठाकरे

जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, या बंगल्याशी भावनात्मक बंध आहेत. या बंगल्याला धक्का न लावता स्मारकाचे बांधकाम होत आहे. स्मारकाचं काम करणं जिकरीचं होतं. २३ जानेवारी २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल.

Mumbai Live: कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळला

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अपघाताला बस मधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने जामीनाची मागणी केली होती. संजय मोरेच्या जामीनाला पोलिसांनी विरोध केला होता. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा आरटीओचा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केला होता. ९ डिसेंबरला झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४२ जण जखमी झाले होते.

Mumbai Live: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाची पाहाणी केली आहे.

Nagpur Live: निकृष्ट दर्जाचं जेवण घेवून हिरामण खोसकर थेट आदिवासी आयुक्त कार्यालयात धडकले

- आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यावरून आमदार हिरामण खोसकर आक्रमक

- आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्या समोर ठेवलं निकृष्ट दर्जाचं जेवण

- आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्यावरून विचारला जाब

Jalna Live: जालन्यात जनआक्रोश मोर्चा

मोर्च्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशीच मागणी देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली आहे

Chandrapur Live: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार गैरहजर

चंद्रपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार उपस्थित नव्हते.

MahaKumbh Mela 2025 LiveUpdate: महाकुंभाला येणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी यावेळी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार

महाकुंभ मेळा १३ जानेवारीपासून उत्तप्रदेशमदील प्रयागराजमध्ये सुरू होणार आहे. या हेलिकॉप्टर सेवेद्वारे, भाविकांना आकाशातून महाकुंभाचे विहंगम दृश्य पाहता येईल

रस्त्यावरील अडथळा ठरणारे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांनाच जुंपले

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच झोपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 110 विद्यार्थी शिक्षण घेतात.

Pune Live : थंडी वाढली, पुण्यातील सारसबागेतील गणपतीला स्वेटर आणि टोपी घातली

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान पुण्यातील सारसबागेतील गणपतीला स्वेटर आणि टोपी घालण्यात आली आहे.

Mumbai Live : मविआत समन्वयाचा अभाव, शरद पवार नाराज असल्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक झाली नसल्याने समन्वयाचा अभाव असून यामुळे शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Pune Live : खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई

पुणे परिवहन विभागाने खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या वाहनचालकांना कारवाई सुरु केली आहे. यासाठी सहा पथके नेमली आहेत.

Mumbai Live : वाहन खेरदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार

वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकी कोंडी आणि प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे वाहन खेरदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग विचार करत आहे.

Bhogawati Election LIVE : 'भोगावती शिक्षण'च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राशिवडे बुद्रुक : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीला मनाई आणण्याची याचिका उच्च न्यायालयातील द्विस्तरीय बेंचने आज फेटाळली यामुळे या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या न्यायालयाने याबाबत जिल्हास्तरावर दाद मागण्याचे आदेश दिल्याचे समजते. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक सध्या सुरू आहे. यासाठी शुक्रवारपासून (ता.१०) उमेदवारी अर्ज भरण्यात येतील. तत्पूर्वी संचालक मंडळाकडून या निवडणुकीला स्थगिती आणण्याचे प्रयत्न सुरू होते. याबाबत आज उच्च न्यायालयाच्या द्विस्तरीय बेंचकडे सुनावणी होती. ही मागणी फेटाळल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Ajra News LIVE : आजरा तालुक्याच्या जंगल परिसरात तीन वाघांचा वावर

आजरा : आजरा तालुक्याच्या जंगल परिसरात तीन वाघांचा वावर आहे. वाघांचे दर्शन स्थानिक रहिवाशांना झाले आहे. दरम्यान, चाळोबा जंगल परिसरातही वाघांचा वावर आहे.

Yoga Guru Baba Ramdev LIVE : तिरुपती येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली भेट

आंध्र प्रदेश : योगगुरू बाबा रामदेव यांनी तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली आणि वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने प्रार्थनाही केली.

Pattankodoli Gram Panchayat LIVE : पट्टणकोडोलीच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी अपात्र

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केले. रायगोंडा डावरे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये या विरोधात याचिका दाखल केली होती.

Manoj Jarange LIVE : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंविरुद्ध दहावा अदखलपात्र गुन्हा

बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील विष्णू चाटे हा आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना एकाने पोलिस ठाण्यात धमकावल्याचा प्रकार घडला होता.

Maharashtra Weather LIVE : राज्यात थंडीचा कडाका कायम, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता

Latest Marathi Live Updates 10 January 2025 : ‘‘महाराष्ट्र पुढील पाच वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असेल, देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून राज्याची ओळख निर्माण झालेली असेल. या परिवर्तनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांची स्वप्ने पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होतील,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. तसेच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निर्णय घेतला नाही. यादीही नाकारली नाही. याबाबत महाविकास आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती आज फेटाळण्यात आली. कोल्हापूरचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली होती. तर, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे गारठा वाढला आहे. एकीकडे थंडी तर आता दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.