नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर असून आज होमग्राऊंड म्हणजेच नागपूर येथील जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याला त्यांनी उपस्थिती दर्शवली. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी, विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. राजकीय घडामोडी, विधानसभा, लोकसभा, मुख्यमंत्रीपद या सर्वच प्रश्नांना फडणवीसांनी मनमोकळेपणे उत्तर दिली. दरम्यान, त्यांना रॅपिड राऊंडमध्ये काही 5 ते 6 महत्वाचे पण तितकेच भन्नाट प्रश्न विचारण्यात आले. त्यावरही फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने मधला मार्ग काढत उत्तरे दिली. यावेळी, सध्याच्या सहकाऱ्यांपैकी अधिक विश्वास कोण, एकनाथ शिंदे च्या अजित पवार (Ajit pawar) असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, दोघांसोबतची असलेली मैत्री त्यांनी विशद केली.
1. राज की उद्धव?
उत्तर – राजकारणात काहीही शक्य असतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, पण उद्धव शत्रू नाहीत, असे उत्तर फडणवीसांनी दिले.
2. एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?
उत्तर – माझ्यापुरतं विचाराल तर माझे दोघांशीही अतिशय एक्स्क्लुझिव्ह संबंध आहेत. त्यांचे वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळे डायनॅमिस्क असू शकतात. पण, शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे. तर, अजित दादांमध्ये खूप पॉलिटीकल मॅच्युरिटी आहे. त्यामुळे, त्यांची आणि माझी व्हेवलेंथ चांगली जुळते असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
3. कठोर राजकारणी कोण, मोदी की शहा?
उत्तर- मला असं वाटतं की मोदीजी हे कठोर पेक्षा अनुशासित राजकारणी आहेत, त्यांनी जीवनात जो मार्ग पकडला त्या मार्गावरु कितीही अडचणी आल्या तरी आजूबाजूला व्हायचचं नाही, हे जे अनुशासन लागतं ते फारत कठीण आहे. माझ्यात त्यातील 10 टक्केही अनुशासन नाही. त्यामुळे, कठोर नाही तर मोदीजी अनुशासित आहेत. अमितभाई ह्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचा निर्णय करण्याचे आपण म्हटले तर, मोदीजी सोयीचा निर्णय घेणार नाहीत. पण, अमितभाईंना पटवून आपण साईचा निर्णय घेऊ शकतो.
4. राजकीय जीवनात घालमेल घडणारा प्रसंग घडल्यास कोणाशी बोलायला आवडेल, नितीन गडकरी की मोदी?
उत्तर- नितीनजी हेच आपल्याला उपलब्ध आहेत, नरेंद्र मोदींकडे आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्न घेऊन जाणार. पण,आपले छोटे-छोटे प्रश्न घेऊन जाणार. मोदींची एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे, मोदी हे आमदार, खासदार यांनीही भेटीसाठी वेळ मागितला तर ते देतात, कौटुंबिक चर्चा करतात. तुमच्या अडचणी समजून घेतात, त्यामुळे मोदींचा स्वभाव वरुन कठोर असला तरी ते हळवे आहेत. आपण, पंतप्रधानांना दररोज भेटू शकत नाहीत, पण त्यांना भेटलो तर चार गोष्टी बोलता येतात, कितीही वेळ बोलता येते, ते ऐकून घेतात असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिली.
5. राष्ट्रीय अध्यक्ष होणे आवडे की मुख्यमंत्री?
उत्तर- जे पक्ष सांगेन ते करायचं. देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला, ती त्याची क्षमता होती म्हणून नाही. तर, आज महाराष्ट्रात भाजपमध्ये अनेक नेते होते. कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. पण, त्यावेळी त्यांना संधी न मिळता मला मिळाली. माझ्या नावापासून भाजप काढून टाकलं तर मला कोणी विचारणार सुद्धा नाही. मी जर भाजपशिवाय उभं राहिलो तर सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील. माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पार्टी आहे. पक्ष ज्या दिवशी सांगेल घरी जा तेव्हा मी घरी जाईल एक प्रतिप्रश्न करणार नाही, असे उत्तर फडणवीसांनी दिले.
6. काशी विश्वनाथ कॉरिडोअर झाला, विठ्ठल कॉरिडोअर कधी?
उत्तर – कॉरिडोअरचं काम आम्ही अद्याप सुरू करु शकलो नाही. माझा प्रयत्न आहे की, पुढील 2-3 महिन्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू करू, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
अधिक पाहा..