देवेंद्र फडणवीस, नागपूर : “माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. हास्य नसलेलं फार क्वचित पाहायला मिळेल. तसं एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाचं चेहरा होता, मात्र कोणी ते नाराज आहेत असा अर्थ लावला नाही. मात्र, ते उपमुख्यमंत्री झाले की, लोक म्हणू लागले बघा एकनाथ शिंदे हसत नाहीत. ते नाराज आहेत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरमधील एका मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिवाराने मित्रात गेल्यानंतर पुनर्जन्म झाल्यासारखं होतं आपलं जीवन साचेबद्ध आहे, पण पण कुटुंबात आणि मित्रांबरोबर असल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी त्याचा उपयोग करतो. मला ड्रायव्हिंगचा शौक आहे, एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस कोणाला तरी बोलावतो आणि तो शौक रात्री बाराच्या नंतर पूर्ण करतो, पनवेल कधीतरी फिरून येतो..
देवेंद्र फडणवीस इतका मोठा झाला कारण पक्ष उभा होता. माझ्या पाठीमागून भाजप काढून टाकले तर मी काहीच नाही. मी स्वतःचा पक्ष काढणार असेही काहीच नाही. माझी ओळख मला माहित आहे, माझ्यासारख्या सामान्य करताना मुख्यमंत्री हे भाजप आणि मोदीजीच करू शकतात. माझी ओळख भारतीय जनता पक्ष आहे….मला कोणी सांगितलं तुम्ही घरी जाऊन बसा तर मी प्रतिप्रश्न विचारणार नाही मी घरी जाऊन बसेल. नितीनजी उपलब्ध असल्यानं जाता येते, मोदीजी आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ मागितला तर देतात. , कौटुंबिक चर्चा अडचणी मोदीजी समजून घेतात, वरून मोदीजी कठोर असले तरी मनातील चार गोष्टी बोलता येतात, ते कितीही वेळ ऐकूण घेतात, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
पुढे बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले, जिरेटोप हा संस्कार आहे, तो घालण्याचा अधिकार महाराजांना आहे, आपण स्वीकारू शकतो, घालू शकतो, त्यांचा प्रमाणे राजकारण चालवण्याचे हिम्मत असेल तर घालावा, जिरेटोप घालण्याचा ज्यांचा अधिकार आहे, 10 टक्के तर काम करू शकलो पाहिजे. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे, दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाही ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024 या काळात केव्हाचं नसेल अशी वाईट परिस्थितीत निर्माण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..