३५ जण ढिगाऱ्याखाली
मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता
उत्तर प्रदेश येथील कन्नौज रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरु असलेल्या छताचा स्लॅब अचानक कोसळल्याने ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर साधारण ३५ जण किंवा त्याहूनही अधिक कामगार त्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती वर्तविली जात आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेत आडकलेल्या १२ कामगारांना आत्तापर्यंत वाचविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. उत्तरप्रदेशच्या राज्य आपत्ती दलाचे पथक, पोलिस आणइ बचाव कर्मचारी घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत. घटनेतून वाचविलेल्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयातही हालविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करावे आणि या दुर्घटनेमध्ये जखमींना तातडीने योग्य उपचार मिळावेत असे निर्देश दिले आहेत.