संतोष देशमुख हत्या प्रकरणात अपडेट
आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मस्साजोग मध्ये ग्रामस्थांची बैठक
संतोष देशमुख यांच्या हस्तेला आज 33 दिवस पूर्ण
यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार
Pune News: पुण्याच्या भोरमध्ये दोन बछड्यांसह बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपुण्याच्या भोर तालुक्यातील नवसह्याद्री कॉलेजजवळील नायगाव- देगाव रोडवर, रात्रीच्या सुमारास तरुणांना दोन बछड्यासह बिबट्याचे झाले दर्शन
बिबट्याचा वावर काही तरुणांनी मोबाईल कॅमेरात केला कैद
ह्या रस्त्यावरून गावी परतत असताना बिबटया दिसताच देगांव येथील शुभम शेलार यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात बिबट्याचा वावर केला कैद
या परिसरात अनेक वेळा स्थानिकांना बछड्यांसह बिबट्याचं दर्शन झालंय, तसेच अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून ठार केलंय..
बिबट्याचा वावर वाढल्यानं स्थानिकांच्यात भीतीचं वातावरण
परिसरात वावरताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे स्थानिकांचं आवाहन
Nagpur News: नागपूरात नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास सुरूवातनागपूर - केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास आजपासून सुरूवात
यशवंत स्टेडियम येथे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले..
आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास 80 हजार खेळाडू सहभागी होणार..
शहरातील 73 मैदानात 58 खेळ खेळवले जाणार..
आज दौड स्पर्धा घेण्यात आली... विजेत्या खेळाडूंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि कंगना रणावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
Pune News: पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकीस्वारपुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकीस्वार
पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची काम सुरू आहेत.
ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत.
दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकीवरून रस्ता शोधत बाहेरपडत असताना दुचाकी उलटली आणि दुचाकीसह चालक ड्रेनेजमध्ये पडला.
किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी स्वराला आणि गाडी स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
Pune News: पुण्यात नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखलपुणे - मकार संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्यापद्धतीने नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
सहकारनगर, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, वारजे, मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३६ हजार ८२० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
Nashik News: नाशिकमध्ये मोठी कारवाई, ४ लाखांचे अमली पदार्थ जप्त- नाशिक शहरात अमली विरोधी पथकाची मोठी कारवाई.
- एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे तीन महिला आणि एक पुरुष आरोपी जेरबंद
- नाशिक शहरातील अमृतधाम, पंचवटी परिसरात एमडी हा अमली पदार्थ विकत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती
- नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून ४ लाख १५ हजार ५०० रुपये किमतीचा ७८.५ ग्रॅम किमतीचा अमली पदार्थ हस्तगत केला तर, इतर 1 लाख 97 हजार हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला...
- अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Nagpur News: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिला ' इमर्जन्सी' चित्रपटनागपूर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पाहिला' इमर्जन्सी चित्रपट
नागपुरात पार पडलेल्या प्रीमियर शो ला होते उपस्थित
कंगना रणौत यांनी प्रमुख भूमिका साकारलेला इमर्जन्सी चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो नागपुरात पार पडला
मेडिकल चौकातील वीआर मॉल मध्ये हा पहिला प्रीमियर शो पाहण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या सह कंगना रणौत स्वतः उपस्थित होत्या
Buldhana News: सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव निमित्य जनसागर उसळालासिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव निमित्य जनसागर उसळाला
राजमाता जिजाऊ यांचा 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार , केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आकाश फुंडकर अभिवादन करण्यासाठी येणार.
परंपरेनुसार सकाळीच शासकीय महापूजा केली जाते
कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ही पूजा केली गेली